बॉलिवूड प्रसिद्ध अभिनेत्री सनी लिओनी एक सुपरहिट अभिनेत्री असण्यासोबतच एक चांगली आई देखील आहे. ती अनेकदा आपल्या दोन मुलांसोबत वेळ घालवताना दिसते. सनी पहिल्यांदा निशा कौर वेबची आई झाली, जेव्हा तिने निशा कौरला दत्तक घेतले. सनी निशाच्या खूप जवळ आहे. नुकताच तिने आपल्या लाडल्या मुलीचा वाढदिवस साजरा केला आणि त्याचे काही फाेटाे साेशल मीडियावर चाहत्यांनसाेबत शेअर केले. चाहते या फाेटाेवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
हा खास प्रसंग अविस्मरणीय बनवण्यासाठी सनी (sunny leone) हिने पती डॅनियल वेबरसोबत विशेष तयारी केली होती. मुलीच्या वाढदिवसानिमित्त सनीने कुटुंबियांसोबत वाढदिवस साजरा केला. फोटोंमध्ये अभिनेत्री आपल्या मुलीला केक खाऊ घालताना दिसत आहे. पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये निशा राजकुमारी दिसत आहे, तर निशाचे दोन्ही जुळे भाऊ फोटोंमध्ये मस्ती करताना दिसत आहेत. सनीने फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले, “माझ्या लहान मुलगी निशाला 7व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!! मी तुझ्यावर खूप प्रेम करते आणि नेहमीच तुला हसत आणि चमकत पाहू इच्छिते जशी तू आहेस.”
View this post on Instagram
सनी लिओनीने सरोगसीच्या माध्यमातून जुळ्या मुलांना दिला जन्म
सन 2017 मध्ये महाराष्ट्रातील लातूर येथून सनीने निशाला दत्तक घेतले होते. निशा त्यावेळी अवघ्या 2 वर्षांची होती. निशाला दत्तक घेऊन 5 वर्षे झाली आहेत. अनेकांनी सनीच्या या पोस्टचे कौतुक केले. 2018 मध्ये सनी आणि डॅनियल दुसऱ्यांदा पालक झाले. जेव्हा त्यांनी सरोगसीच्या माध्यमातून जुळ्या मुलांना जन्म दिला. त्यांनी त्यांची नावे आशेर आणि नोहा ठेवले आहेत.
सनी लिओनच्या कारकीर्द विषयी बाेलायचे झाले, तर सनीने ‘जिस्म 2’ मधून बाॅलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ती ‘रईस’मध्ये शाहरुख खानसोबत ‘लैला’ या लोकप्रिय आयटम नंबरमध्ये दिसली हाेती. याव्यतिरिक्त ती ‘अनामिका’ या वेबसीरिजमध्येही दिसली होती.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
‘ड्रीमगर्ल’ हेमा मालिनी यांना बिग बींच्या मुलाला बनवायचे होते जावई, पण ईशाने ‘या’ कारणामुळे दिला नकार
पन्नाशी उलटली तरी अबाधित आहे हेमा मालिनींच्या सौंदर्याची जादू आहे, ‘या’ कार्यक्रमात केले सलग दोन तास नृत्य