सनी लिओनीने मवाली स्टाईलमध्ये केला डान्स, चक्क लुंगी नेसून उडवली चाहत्यांची झोप

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone) नेहमीच तिच्या फोटो आणि व्हिडिओमुळे सोशल मीडियावर आग लावते. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तसेच तिचा सोशल मीडियावरील चाहतावर्ग खूप मोठा आहे. आपल्या चाहत्यांशी जोडून राहण्यासाठी सनी नेहमी फोटो आणि मजेदार व्हिडिओ शेअर करत असते. नुकताच समोर आलेला सनीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सनीचे नाव इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींच्या यादीत समाविष्ट आहे. अभिनेत्री तिच्या सौंदर्य आणि ग्लॅमरस स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असते. बॉलिवूडच्या बेबी डॉलचे चाहते केवळ भारतातच नाही, तर परदेशातही आहेत. सनीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात ती नेहमीप्रमाणे यातही आपली जादू पसरवत आहेत, पण निराळ्याच अंदाजात. (sunny leone video on instagram wearing lungi actress dancing with her team oh my ghost)

सनी सध्या तिच्या आगामी ‘ओह माय घोस्ट’ या तमिळ चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. दरम्यान, अभिनेत्रीने एक छोटा डान्स व्हिडिओ बनवला आहे, ज्यावर म्यूझिक एका खास हॉलिवूड सीरिजचे आहे. यात तिने चक्क लुंगी घातली आहे. लुंगीमध्ये सनी खूपच क्यूट दिसत आहे. तिच्या या व्हिडिओला २ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Sunny Leone (@sunnyleone)

लूकबद्दल बोलायचे झाले, गळ्यात हँकी, गुलाबी शर्ट-निळी लुंगी आणि पायात पिवळे शुज घातलेली अभिनेत्री अप्रतिम दिसत आहे. त्यामुळेच सोशल मीडियावर बेबी डॉलच्या चाहत्यांची फौज तिच्या फोटो आणि व्हिडिओंवर दिलखुलास प्रतिसाद देण्यासाठी सदैव तयारच असते.

सनी लिओनीने तिच्या ग्लॅमरस अदा आणि अभिनय कौशल्याच्या जोरावर बॉलिवुडमध्ये तिचे स्थान निर्माण केले आहे. तिने तिच्या करिअरची सुरुवात ‘जिस्म २’ या चित्रपटातून केली. त्यानंतर तिने ‘जॅकपॉट’, ‘रागिणी एमएमएस २’, ‘एक पहेली लीला’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. सनी लिओनीचे आता इंस्टाग्राम वर जवळपास ४२ मिलियन फॉलोव्हर्स आहेत.

हेही वाचा-

Latest Post