दिलीप कुमार यांची जयंती: करिअरमध्ये कित्येकांच्या कानाखाली काढला जाळ, अमिताभही थोडक्यात वाचले; वाचा खास किस्सा


बॉलिवूडचे दिवंगत दिग्गज अभिनेते दिलीप कुमार (Dilip Kumar) हे त्यांच्या दमदार अभिनय आणि जबरदस्त संवाद शैलीसाठी आजही चाहत्यांच्या स्मरणात आहेत. दिलीप कुमार हे जरी आज आपल्यात नसले, तरीही चाहत्यांच्या मनावर ते कायम राज्य करत राहतील.

याच वर्षी ७ जुलै २०२१ रोजी दिलीप कुमार यांचे निधन झाले. ते जरी आज हयात नसले, तरीही चाहत्यांना त्यांच्या जन्मदिनी त्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. ११ डिसेंबर म्हणजे आज त्यांचा वाढदिवस. त्यांच्या जयंतीनिमित्त आपण ‘लिव्हिंग लिजेंड’ आणि ‘ट्रॅजेडी किंग’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या दिलीप साहेबांशी संबंधित अनेक अविस्मरणीय क्षण आणि गोष्टींबद्दल जाणून घेऊया.

दिलीप कुमार उर्फ ​​मोहम्मद युसूफ खान यांचा जन्म ११ डिसेंबर १९२२ रोजी पाकिस्तानातील पेशावर शहरात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव लाला गुलाम सरवर होते, ते फळे विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असत. फाळणीच्या काळात त्यांचे कुटुंब मुंबईत स्थायिक झाले. त्यांचे सुरुवातीचे आयुष्य गरिबीत गेले. वडिलांच्या व्यवसायात तोटा झाल्यामुळे ते पुण्यात कॅन्टीनमध्ये काम करू लागले. तिथेच देविका राणी यांची पहिली नजर त्यांच्यावर पडली आणि त्यांनीच दिलीप यांना अभिनेता बनवले. देविका यांनी त्यांचे नाव ‘युसूफ खान’ ऐवजी ‘दिलीप कुमार’ असे ठेवले.

‘ट्रॅजेडी किंग’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या दिलीप यांची तुलना कोणत्याही कलाकाराशी करणे फार कठीण आहे. सुरुवातीच्या चित्रपटांमध्ये ते ट्रॅजेडी किंग आणि रोमान्स करताना दिसत होते. पण हळूहळू त्यांनी पडद्यावर विलन भुमिका साकारण्यास सुरुवात केली. दिलीप यांची चित्रपटातील इतर व्यक्तीला चापट मारण्याची भुमिका चित्रपट गृहापासून ते बॉक्स ऑफिसपर्यंत झळकली.

कर्मा (१९८६)

दिग्दर्शक सुभाष घई यांच्या या सुपरहिट देशभक्तीपर चित्रपटात दिलीप कुमार यांनी अनुपम खेर यांच्या गालावर बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय चापट मारली होती. डॉ. डांगच्या रूपात, अनुपम खेर यांचे पात्र जेलर राणा विश्व प्रताप ठाकूरच्या तुरुंगात येते आणि तिथेच ऐतिहासिक सीन दिसते, जेव्हा दिलीप डॉक्टर डांगला चापट मारतात. डॉक्टर डांग म्हणतात की, या चापटीचा आवाज संपूर्ण जगाला ऐकू येईल. पण खरेतर चापट मारल्यानंतर सर्वजण असेच बोलतात.

मशाल (१९८४)

दिलीप कुमार यांची ‘कर्मा’मधील चापट नक्कीच लोकप्रिय आहे. पण अमरीश पुरी यांच्या ‘मशाल’ चित्रपटाइतकी जोरात नाही. यश चोप्रांच्या या सुपरहिट चित्रपटात ते पहिल्या भागात एका प्रामाणिक पत्रकाराच्या भूमिकेत दिसत आहेत. बिझनेसमन अमरीश पुरी त्यांना लाच द्यायला देतात आणि अशी चापट खातात की, शेवटच्या सीनपर्यंत ते दिलीप यांना घाबरतात.

राम और श्याम (१९६७)

‘राम और श्याम’ या चित्रपटावर ‘सीता और गीता’, ‘चालबाज’, ‘जुडवा’ सारखे चित्रपट आले. ज्याने जुळ्या चित्रपटांची सीरिज सुरू केली. या चित्रपटात, रामाच्या ऐवजी श्रीमंत घरात प्रवेश केलेला श्याम, दुष्ट काकाची भूमिका साकारत असलेल्या प्राणला भेटतो, तेव्हा प्राणला एक जोरात चापट बसते आणि त्याचे खलनायकी पात्र ट्रॅकवर येते.

मुघल-ए-आझम (१९६०)

के आसिफ यांच्या ‘मुघल-ए-आझम’ या क्लासिक चित्रपटात दिलीप कुमार यांनी मधुबालाला मारलेली चापट आजही चित्रपट कथांचा अविभाज्य भाग आहे. प्रेमसंबंधातील कटुता संपल्यानंतर ‘मुघल-ए-आझम’ हा दोघांचा सहकलाकार म्हणून शेवटचा चित्रपट ठरणार होता.

दोघांमध्ये इतकी कटुता होती की, दिलीप आणि मधुबाला फक्त सीनच्या वेळीच एकमेकांसमोर यायचे. या चित्रपटादरम्यान दिलीप यांना एका सीनसाठी मधुबालासोबत खडतर संवाद साधावा लागला तेव्हा त्यांनी तिला चापट मारली. या चापटीची स्क्रिप्टमध्ये गरज होती की नाही, हे स्पष्ट नाही. पण हो, युसूफ साहबचा राग खलनायकासह नायिकेवरही उतरला.

शक्ती (१९८२)

अमिताभ बच्चन आणि दिलीप कुमार यांच्या अभिनयाने बनलेला हा ‘शक्ती’ चित्रपटही लक्षात राहतो. कारण हा त्यांचा एकमेव एकत्र चित्रपट होता. या चित्रपटातही दिलीप कुमार अमिताभ यांच्यावर चांगलेच चिडले आहेत. त्यावेळी लोकांना वाटले की, आज चापट बसणारच, पण नंतर अमिताभ यांच्या आईच्या भूमिकेत दिसणारी राखी पती दिलीप यांना थांबवते. नाहीतर अमिताभ यांना दिलीप कुमार यांनी चापट मारलीच असती.

हेही वाचा – 


Latest Post

error: Content is protected !!