Friday, February 3, 2023

प्रदर्शनाच्या अधिक कायद्याच्या कचाट्यात अडकला रणवीर सिंगचा ’83’ सिनेमा, निर्मात्यांविरोधात धोखाधडीची तक्रार

कोणताही नवा सिनेमा प्रदर्शित होणार म्हटल्यावर प्रेक्षकांमध्ये त्या चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता दिसून येते. मात्र जसं जशी चित्रपटाबद्दल अधिक माहित समोर यायला लागते किंवा सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित केला जातो, गाणी प्रदर्शित होतात त्यानंतर तर कधी सिनेमा प्रदर्शनाच्या जवळ आल्यानंतर त्या सिनेमाशी संबंधित अनेक वाद देखील बाहेर येतात. आता कधी कधी हे वाद सिनेमाच्या पब्लिसिटीसाठी केले जातात तर काही सिनेमे खरोखरच वादात अडकतात. मात्र जसे दिवस जातात तसे हे वाद अचानक गायब होतात. तसे पाहिले तर सिनेमा आणि वाद हे तर समीकरणच झाले आहे. अगदी शुल्लक गोष्टींवरून देखील मोठे वाद उभे राहिल्याचे आपण अनेकदा पाहिले आहे. या वादांमधून कोणताही सिनेमा वाचत नाही.

लवकरच रणवीर सिंगचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ’83’ हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. सिनेमाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा दमदार प्रतिसाद मिळत असून, गाण्याला चांगला रिस्पॉन्स आहे. यासर्वांमधे हा सिनेमा एका वादात अडकला आहे. या सिनेमाविरोधात यूएई मध्ये राहणाऱ्या एका फायनान्सरने धोखाधडीचा आरोप केला असून, त्याने मुंबईच्या मेट्रोपॉलिटन कोर्ट केस दाखल केली आहे.

तक्रारदार असणाऱ्या FZE ने ’83’च्या निर्मात्यांसोबतच दीपिका पदुकोनवर देखील धोखाधडीचा आरोप लावला आहे. या तक्रारतीत सिनेमाचे दिग्दर्शक कबीर खान आणि निर्माते साजिद नाडियादवाला यांच्यासोबतच इतर अनेकांची नावे आहे.

त्या फायनान्सरने सांगितले आहे की, जवळपास १६ कोटी रुपयांची गुंतवणूक केल्यानंतर त्याच्या कंपनीला विब्री मेडीकडून चांगले रिटर्न देण्याचे वचन दिले होते. मात्र त्या फंडला नंतर कबीर खान, साजिद नाडियादवाला आणि दीपिका पदुकोण यांनी चित्रपटाशी निगडित इतर कामांमध्ये वापरले.

FZE चे सांगणे आहे की, त्या पैशांच्या वापरासाठी त्यांची परवानगी देखील घेतली गेली नाही. मात्र आता FZE ला काढून टाकण्यात आल्यानंतर त्याने ’83’ सिनेमाच्या निर्मात्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे. ’83’ला साजिद नाडियादवालासोबतच फँटम फिल्म्स, विबरी मीडिया, दीपिका पादुकोण,कबीर खान आणि रिलायन्स एंटरटेनमेंटने मिळवून प्रोड्युस केले आहे.

रणवीर सिंगचा ’83’ हा सिनेमा १९८३ साली भारताला मिळालेल्या ऐतिहासिक अशा वर्ल्डकपच्या विजयावर आधारित असून, यात रणवीर कपिल देव यांच्या भूमिकेत तर दीपिका कपिल देव यांच्या पत्नीच्या रोमी भाटियाच्या भूमिकेत दिसणार आहे.

हेही वाचा :

जाणून घ्या कॅटरिना आणि विकी यांच्या लग्नातील लुकबद्दल आणि काही खास गोष्टींबद्दल

पदार्पणातच अमिताभ बच्चन यांच्यासोबत कॅडबरीची जाहिरात करणाऱ्या अंजनाने केला होता डिप्रेशनचा सामना

साताजन्माची गाठ! विकी आणि कॅटरिनाने लग्नातील सुंदर फोटो केले शेअर, तुम्हीही पाहिल्याशिवाय राहणार नाही

 

हे देखील वाचा