Friday, April 25, 2025
Home बॉलीवूड सुष्मिता सेनचा मुलींसोबतचा मजेशीर वर्कआऊट व्हिडिओ, पाहून थिरकतील तुमचेही पाय

सुष्मिता सेनचा मुलींसोबतचा मजेशीर वर्कआऊट व्हिडिओ, पाहून थिरकतील तुमचेही पाय

लोकप्रिय अभिनेत्री सुष्मिता सेन बॉलिवूडमध्ये तिच्या स्टाईल आणि फॅशनसाठी सोशल मीडियावर सतत चर्चेत असते. ती सोशल मीडियावर नवनवीन पोस्ट करत राहते. सुष्मिता आपल्या मुलींसोबत खूप मस्ती करताना दिसत आहे. सुष्मिताच्या दोन्ही मुली अनेकदा तिच्या लाइव्ह व्हिडिओमध्येही दिसतात. तसेच या तिघीही प्रत्येक वीकेंडला एन्जॉय करताना दिसल्या आहेत. अलिकडेच सुष्मिताने तिच्या दोन मुलींसोबत डान्स करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तिघीही फॅमिली गोल्स देताना दिसत आहेत.

सुष्मिता मुलींसोबत दिसली डान्स मूव्ह्ज दाखवताना

व्हिडिओमध्ये तिघीही एकत्र डान्स करताना आणि फनी मूव्ह्ज करताना दिसत आहेत. विशेषत: अभिनेत्री सुष्मिताचा (Sushmita Sen) डान्स पाहण्यासारखा आहे. व्हिडिओमध्ये सुष्मिताची धाकटी मुलगी अलिजा सेनसोबत खूप फनी डान्स करताना दिसत आहे. यादरम्यान, तिघीही कॅमेऱ्यासमोर येतात आणि त्यांच्या डान्स मूव्ह्ज दाखवतात. यासोबतच सुष्मिताही तिचे केस फ्लॉन्ट करताना दिसत आहे.

मुलांसोबत व्हिडिओ केला शेअर

सुष्मिता अनेकदा तिच्या मुलांसोबतचे अनेक फोटो शेअर करत असते आणि त्या दोघींसाठी अनेक सुंदर प्रेमळ मेसेजही लिहिते. हा व्हिडिओ शेअर करताना सुष्मिताने लिहिले की, “जर तुम्हाला वर्कआऊट करत आहे असे वाटत नसेल, तर चला डान्स करूया. तुमच्या मनातील गोष्ट ऐका, बीट्सचे अनुसरण करा आणि गाण्यावर तुमच्या ट्यूनवर डान्स करा. ” #mamapride सोबत सुष्मिताने तिच्या दोन मुली अलिजा आणि रिनी यांचेही आभार मानले.

सुश्मिताने मिस युनिव्हर्सचा किताब जिंकल्यानंतर चित्रपटांमध्ये प्रवेश केला होता. तिने ‘बीवी नंबर वन’, ‘मैं हूं ना’, ‘मैने प्यार क्यों किया’, ‘तुमको ना भूल पायेंगे’ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

आर्या सीरिज झाली प्रदर्शित

सुष्मिता सेनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर नुकतीच सुष्मिताची ‘आर्या’ ही थ्रिलर सीरिज प्रदर्शित झाली आहे. ज्यामध्ये सुष्मिता सेनच्या अभिनयाचे खूप कौतुक होत आहे. राम माधवानी दिग्दर्शित या सीरिजला आयएमडीद्वारे ७.८ रेटिंग दिले आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा