बॉलिवूडचा हँडसम हंक ऋतिक रोशन (१० जानेवारी) त्याचा ४८ वा वाढदिवस साजरा करत आहे. या अभिनेत्याचे सोशल मीडियावर खूप अभिनंदन होत आहे आणि या खास प्रसंगी त्याला अनेक भेटवस्तू मिळाल्या असतील अशी अपेक्षा केली जाऊ शकते. पण या खास दिवशी दुसऱ्याच्या गिफ्टची वाट पाहण्याऐवजी ऋतिकने स्वतःला एक खास गिफ्ट दिले आहे. ‘मोगली’ असे या भेटवस्तूचे नाव आहे. ऋतिकने त्याच्या वाढदिवसाआधी खूप खास काम केले आहे आणि सोशल मीडियावर त्याच्या खास मित्र ‘मोगली’ची एक झलकही शेअर केली आहे.
ऋतिकने (Hrithik Roshan) त्याच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी, सुपरस्टारने जगाला त्याच्या कुटुंबातील एका नवीन सदस्याची, एका भटक्या कुत्र्याची ओळख करून दिली. ऋतिकने मोगलीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो त्याच्या घरात खेळताना दिसत आहे. ऋतिकने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये सांगितले आहे की, रस्त्यावर फिरणाऱ्या या भटक्या कुत्र्याला त्याने कुठून घरी आणले आहे.
ऋतिकने त्याच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले की, “नमस्कार मित्रांनो, मी मोगली आहे. हे माझे नाव आहे. माझ्यासारख्या अनेक पिल्लांची काळजी घेणारी रोजी नावाची स्त्री मला गाडीखाली सापडली आहे. आमच्यासारख्या कुत्र्याच्या पिल्लांसाठी हे जग एक सुंदर ठिकाण बनवल्याबद्दल रोजीचे आभार. त्यामुळे आता मला वाटत आहे की, मी तुम्हा लोकांना खूप भेटणार आहे, म्हणून जेव्हाही तुम्ही मला पाहाल तेव्हा मला नक्कीच ‘हाय’ म्हणा.” ऋतिकने या पोस्टसह #adopted #indiapup #indianindies #dogsofinstagram #arenticute हे हॅशटॅग शेअर केले आहेत.
ऋतिकच्या या पोस्टवर आता त्याचे चाहते मोगलीच्या क्यूटनेसवर खूप खुश होत आहेत. प्रियांका चोप्राने ऋतिकच्या या पोस्टवर कमेंट केली आहे की, “आत्तापर्यंतचा सर्वोत्तम निर्णय. हाय मोगली.” त्याचवेळी टायगर श्रॉफ, वरुण धवन, क्रिती सेनन यांसारख्या अनेक कलाकारांनी ऋतिकच्या घरी आलेल्या या छोट्या पाहुण्या मोगलीचे मनापासून स्वागत केले.
अलिकडच्या काळात ऋतिकने त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर जय शेट्टीच्या हेल्प इंडिया ब्रेथ, ट्रान्सजेंडर समुदायाला पाठिंबा, स्थानिक प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी, पॅरालिम्पिकमधील भारतीय सहभागींचे मनोबल वाढवण्यासाठी निधी उभारण्यासाठी केला आहे.
ऋतिक रोशनच्या वाढदिवसानिमित्त अभिनेता आणि त्याच्या चाहत्यांना एक खास भेट मिळाली आहे. निर्मात्यांनी त्याच्या आगामी ‘विक्रम वेधा’ या चित्रपटातील त्याचा फर्स्ट लूक प्रदर्शित केला आहे. ‘विक्रम वेधा’मधील ऋतिकचा फर्स्ट लूक पाहून त्याचे चाहते खूप खूश आहेत. चित्रपटातील ऋतिकचा फर्स्ट लूक प्रदर्शित करत निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली आहे. त्यानुसार हा चित्रपट ३० सप्टेंबर २०२२ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात ऋतिक रोशनसोबत सैफ अली खानही मुख्य भूमिकेत दिसणार आहे, तर राधिका आपटेही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहे.
ऋतिक रोशनने २००० मध्ये ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटाने सर्वाधिक पुरस्कार मिळवण्याचा विक्रम केला. २१ वर्षात ऋतिक रोशनने बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याने एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले. आपल्या पहिल्याच चित्रपटातून अनेक पुरस्कार जिंकणारा ऋतिक रोशन फोर्ब्सच्या यादीत सर्वाधिक लोकप्रिय व्यक्तिमत्त्व ठरला आहे. ऋतिकला अभिनयाचा वारसा मिळाला असला तरी त्यासाठी त्याला खूप मेहनत करावी लागली आहे.
हेही नक्की वाचा-