Sunday, May 19, 2024

प्रेयसीचे 35 तुकडे करणाऱ्या आफताबवर स्वराचा राग आला उफाळून; ट्विट करत म्हणाली…

श्रद्धा मर्डर प्रकरणाने सर्वांनाच हादरवून सोडले असून त्याची देशभर चर्चा होत आहे. सोशल मीडियावर युजर्स सतत या विषयावर बोलत आहेत. अशा परिस्थितीत बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर हिनेही ट्विट करून आपली नाराजी व्यक्त केली आहे. श्रद्धाची हत्या करणारा आरोपी आफताब अमीन पूनावाला याचे वर्णन तिने ‘राक्षस’ असे केले आहे.

याप्रकरणी स्वरा (Swara Bhaskar) हिने ट्विट करत लिहिले की, “हे प्रकरण किती भयावह आणि दुःखद आहे यासाठी शब्दच नाही. मला त्या मुलीसाठी फार वाईट वाटत आहे. तिने प्रेम केले इतका विश्वास ठेवला आणि त्यानं भयंकर विश्वासघात केला. पोलिस त्यांचा तपास जलदगतीने पूर्ण करतील आणि या राक्षसाला त्याची कठोर शिक्षा मिळेल अशी आशा आहे.”

माध्यमातील वृत्तानुसार, आफताब सध्या तुरुंगात असून त्याच्यावर 24 तास नजर ठेवण्यात येत आहे. आफताब अमीन पूनावाला यांने आपल्या प्रेयसीची हत्या करून तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे केल्याचा आरोप आहे. हे तुकडे त्यांनी दिल्लीभर फेकले होते. 28 वर्षीय आरोपी आफताब दक्षिण दिल्लीतील मेहरौली पोलिस स्टेशनच्या जेलमध्ये दिसत आहे. या कक्षात आणखी एक आरोपी देखील आहे. दिल्लीतील या खळबळजनक प्रकरणानंतर आरोपींवर कडक नजर ठेवण्यात आली आहे.

स्वराच्या वर्कफ्रंटबद्दल बाेलयचे झाले तर, स्वरा अलीकडेच कमल पांडे दिग्दर्शित ‘जहां चार यार’ या चित्रपटात मेहेर विज, शिखा तलसानिया आणि पूजा चोप्रा यांच्यासोबत दिसली होती. हा कॉमेडी चित्रपट चार विवाहित मित्रांचा प्रवास कथन करतो ज्यांना स्वतःच्या अटींवर आयुष्य जगायचे आहे. या चित्रपटाव्यतिरिक्त स्वरा ‘मिसेस फलानी’ या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट नऊ लघुकथांचे संकलन आहे, ज्यामध्ये स्वरा वेगवेगळ्या पात्रांमध्ये दाखवण्यात येणार आहे. (actress swara bhaskar anger erupted over shraddha murder case told aftab a monster read viral tweet)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
आंतरराष्ट्रीय फॅशन ब्रॅडचे भारतात हाेणार जोरात प्रमोशन! अनुष्का शर्मासोबत केला करार

‘आक्कल दाढ काढली म्हणून आक्कल पण…;’म्हणत, धनश्री काडगावकरने शेअर केला व्हिडिओ

हे देखील वाचा