Sunday, May 19, 2024

‘आक्कल दाढ काढली म्हणून आक्कल पण…;’म्हणत, धनश्री काडगावकरने शेअर केला व्हिडिओ

तुझ्यात जिव रंगला‘ या मालिकेतून ‘वहिनीसाहेब’ या भूमिकेनी प्रेक्षकांवर राज्य करणारी अभिनेत्री धनश्री काडगावकर हिने मालिकाच नाही, तर मराठी चित्रपटातही मुख्य भूमिका निभावल्या आहेत. मात्र, तुझ्यात जिव रंगला या मालिकेतील तिच्या खलनायकी भूमिकेमुळे ती घराघरात पोहोचली. या मालिकेने आख्या महाराष्ट्राला भुरळ घातली होती. धनश्री या मालिकेनंतर ‘तु चाल पुढ‘ यामध्ये परतली. यामध्ये देखिल तिच्या खलनायकी भूमिकेला प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आहे. तिने सोशल मीडियावर नुकतांच एक व्हिडिओ शेअर केला आहे. जो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय.

अभिनेत्री धनश्री काडगावकर (Dhanashri Kadgaonkar) हिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती हॉटेमध्ये जेवताना दिसत आहे. ही कोणती जेवणाची नवीन पद्धत? असा प्रश्न तुम्हाला  तिचा व्हिडिओ पाहून  पडेल, याच प्रश्नाचं उत्तर तिने आपल्या व्हिडिओमध्ये दिला आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये धनश्रीला तिच्या मित्रांनी तिच्या परिस्थितीवर काही प्रश्न थट्टा करत विचारले आहेत. अभिनेत्रीची आक्कल दाढ काढल्यामुळे तिला व्यवस्थित जेवन करता येत नाही. त्यामुळे सगळ्यांनी तिची मज्जा घेत तिला म्हटलं आहे की, ‘चार लोकात बसून तू अशी जेवतेय हे मला ॲडजस्ट करावं लागतंय’, असं म्हणत तिच्या मित्राने खिल्ली उडवली. मात्र, यावर अभिनेत्रीने वहिनीसाहेब सारखं खनकदार उत्तर देत सांगते की, “अक्कल दाढ जरी काढली असली तरी माझं शाहणपण गेलेलं नाही. नंतर ती म्हणते की, यावर हसनं देखिल कठीण झालं असूनही मी चाहत्यांसोबत फोटो काढत आहे.”

हा व्हिडिओ शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, “तुमच्या आयुष्यात आहेत का असे काही मित्र जे विचारतात, अक्कलदाढ काढली आता तरी येईल ना अक्कल? किंवा अक्कलदाढ काढल्यामुळे सगळी अक्कल पण गेली का?’ असे टिपिकल प्रश्न तुमच्या मित्रांनीही विचारलेत का?” असं तिने पोस्टमध्ये लिहिले आहे.

अभिनेत्रीने ही पोस्ट सोमवार (दि, 14 नोव्हेंबर) रोजी आपल्या अधिकृत इंस्टाग्रामवर शेअर केली असून तिच्या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंटचा वर्षाव केला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ कमालीची धमाल केली आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
आंतरराष्ट्रीय फॅशन ब्रॅडचे भारतात हाेणार जोरात प्रमोशन! अनुष्का शर्मासोबत केला करार
सारासोबतच्या नात्यावर शुभमन गिलने तोडले मौन; म्हणाला, ‘सारा द सारा..’

हे देखील वाचा