Tuesday, May 28, 2024

आंतरराष्ट्रीय फॅशन ब्रॅडचे भारतात हाेणार जोरात प्रमोशन! अनुष्का शर्मासोबत केला करार

बाॅलिवूड लाेकप्रिय अभिनेत्री अनुष्का शर्मा तिच्या आगामी चित्रपट ‘चकडा एक्सप्रेस‘च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे, तिने ब्रँड्सच्या जगात एक नवा टप्पा पार केला आहे. 21 वर्षीय फॅशन ब्रँड मायकल कॉर्सने तिची भारतातील नवीन ब्रँड ऍम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मायकल कॉर्स अनेक दिवसांपासून भारतात आपल्या घड्याळांची जाहिरात करण्यासाठी, प्रसारित करण्यासाठी अशा प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वाच्या शोधात होते, जे वेळेनुसार स्वत:ला जुळवून घेत मानवी संवेदना उत्कटतेने मांडण्यात सक्षम आहेत.

अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) हिची गणना हिंदी चित्रपटसृष्टीतील टॉप स्टार्समध्ये केली जाते. ब्रँड मार्केटमध्ये तिची ताकद सुरुवातीपासूनच दिसून येत आहे आणि क्रिकेटर विराट कोहलीशी लग्न केल्यानंतर ती देशातील सर्वात लोकप्रिय पॉवर कपलपैकी एक आहे. आजकाल ‘चकडा एक्सप्रेस’ (Chakda ‘Xpress) या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असणारी अनुष्का हिने या नव्या कामगिरीची घोषणा मंगळवारी (15 नाेव्हेंबर)ला केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

मायकेल कॉर्स (michael kors)विषयी बाेलताना अनुष्का शर्मा म्हणाली, “मी या कंपनीच्या घड्याळांच्या अनोख्या डिझाईनची दीर्घकाळापासून प्रशंसक आहे आणि मला आनंद होत आहे की, मी भारतात याची ऍम्बेसेडर बनली आहे. माझ्यासाठी, मायकेल कॉर्स ब्रँड तत्त्वांचे असे प्रतिबिंब आहे जे लोकांचे खरे वैयक्तिक अभिव्यक्ती व्यक्त करण्यासाठी आणि सतत स्वत: चा शोध घेण्याचे साधन राहिले. त्याला स्वतःचा एक ऐतिहासिक वारसा आहे आणि त्याच्याशी निगडीत असल्याचा मला सन्मान वाटतो.”

फॉसिल इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक जॉन्सन वर्गीस देखील अनुष्का शर्मा मायकल कॉर्सचा चेहरा बनल्याने खूप आनंदी आहे. ते म्हणाले, “अनुष्का शर्माची कारकीर्द खूप चांगली आहे. पडद्यावरच्या तिच्या अभिनयाव्यतिरिक्त, तिची स्वतःची शैली देखील एका लोकप्रिय व्यक्तिरेखेची उत्स्फूर्तता आणि लालित्य दर्शवते. एखाद्याची वैयक्तिक ओळख आणि मूल्ये पुढे नेण्यात तिचा विश्वास आहे.”

साेशल मीडियावर अनुष्काचा 61.2 मिलियन इतका माेठी चाहता वर्ग आहे. जाे तिला फाॅलाे करून तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करताे. (michael kors introduces actress anushka sharma as the newest michael kors india watch ambassador)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अरे वाह! ‘पिंजरा खूबसुरती का’ फेम साहिल उप्पल ‘या’ लेखिकेसाेबत अडकणार लग्न बंधनात

धक्कादायक! लग्न 5 दिवसांवर आलं असताना नागा शौर्याची प्रकृती बिघडली

हे देखील वाचा