‘त्याचे सिनेमे फ्लॉप व्हावेत…’, अक्षयबद्दल स्वराचे खळबळजनक वक्तव्य, पण असं का म्हणाली अभिनेत्री?

0
113
Akshay-Kumar-And-Swara-Bhasker

आपल्या बिंधास्त आणि बेधडक वक्तव्यासाठी प्रसिद्ध असलेल्या अभिनेत्रींमध्ये स्वरा भास्कर हिचाही समावेश होतो. स्वरा देशात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर आपले मत बेधडकपणे मांडताना दिसते. तिचा नुकताच ‘जहां चार यार’ हा सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. तसेच, ती या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अशात स्वरा सातत्याने कार्यक्रमांमध्ये हजेरी लावत पत्रकारांशीही चर्चा करत आहे. नुकतेच स्वराने तिच्या एका मुलाखतीत बॉलिवूडला टार्गेट करण्याबद्दल चर्चा केली. यासोबत तिने सांगितले की, अक्षय कुमार जे सिनेमे करतो, त्याने ती सहमत नाही.

झालं असं की, अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhasker) हिला नुकत्याच एका मुलाखतीत विचारले की, बॉलिवूडमध्ये कलाकारांना टार्गेट केले जाते का? या प्रश्नाचे उत्तर मोकळेपणाने देत स्वरा म्हणाली की, “आम्ही कहाणी वाचणारे लोक आहोत आणि आम्हाला प्रामाणिकपणे कहाणी ऐकल्याही पाहिजेत. माझा असा विश्वास आहे की, बॉलिवूडला स्वत:ला प्रोपगंडाचे माध्यम झाले नाही पाहिजे. बॉलिवूडमध्ये असे कधीच झाले नाही की, इथे एकच आवाज येतो. हेच या जागेचे वेगळेपण आहे. अक्षय कुमार ज्या प्रकारचे सिनेमे करतो, त्याच्याशी मी सहमत नाही. याचा अर्थ असा नाही की, मला वाटते त्याचे सिनेमे फ्लॉप व्हावेत किंवा त्याने त्याचे सिनेमे प्रदर्शित केले नाही पाहिजेत.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Swara Bhasker (@reallyswara)

यापुढे स्वरा म्हणाली की, “लोकशाहीत लोकांना आपले राजकीय विचार पुढे घेऊन जाण्यासाठी सक्षम झाले पाहिजे. पहिले ते विचार करत होते की, स्वरा ही चिंता आहे. आपण हुकूमशाहीच्या संस्कृतीचे समर्थन करत आहोत. मॉब कल्चरपासून कोणीही सुरक्षित राहणार नाही. गोष्ट एवढीच आहे की, मी रांगेत इतरांपेक्षा पुढे आहे.”

नुकताच अक्षय कुमार ‘कठपुतली’ हा सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. यापूर्वी अक्षयचे तीन बिग बजेट सिनेमे प्रदर्शित झाले आहेत. त्यामध्ये ‘बच्चन पांडे’, ‘सम्राट पृथ्वीराज’ आणि ‘रक्षाबंधन’ यांचा समावेश आहे. मात्र, हे तिन्ही सिनेमे फ्लॉप ठरले. दुसरीकडे, स्वरा ‘जहां चार यार’ हा सिनेमा प्रेक्षकांना चित्रपटगृहात आणण्यासाठी अपयशी ठरला आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
धक्कादायक! लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान धाडकन तोंडावरच आपटला प्रसिद्ध रॅपर, वेदनेने विव्हळत होता गायक
नवाब सैफचा मजेशीर खुलासा! फार्महाऊसवर कोंबड्या पकडण्यासाठी ठेवलाय ‘कोंबडा’, पाहा व्हिडिओ
‘तर खपवून घेणार नाही…’ मिमिक्री केल्यानंतर उषा नाडकर्णी यांचा थेट श्रेया बुगडेला कॉल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here