‘तर खपवून घेणार नाही…’ मिमिक्री केल्यानंतर उषा नाडकर्णी यांचा थेट श्रेया बुगडेला कॉल

मराठी टेलिव्हिजनवरील ‘बस बाई बस’ हा कार्यक्रम प्रचंड लोकप्रिय आहे. कार्यक्रमात अनेक कलाकार सहभागी होत असतात. कार्यक्रमात सहभागी झालेले कलाकार अनेक रंजक खुलासे करताना दिसत असतात. अलिकडेच या कार्यक्रमात अभिनेत्री श्रेया बुगडेने सहभाग घेतला होता. यावेळी श्रेयाने अनेक मजेशीर किस्से शेअर केले. ज्यामध्ये तिने चला ‘हवा येऊ द्या’ कार्यक्रमात उषा नाडकर्णी यांची मिमिक्री केल्यानंतर त्यांचा कॉल आल्याचे सांगितले. हा संपूर्ण किस्सा ऐकून कार्यक्रमातील सगळेच थक्क झाले.

याबाबत संपूर्ण माहिती अशी की श्रेया बुगडे (Shreya Bugde) ही मराठी सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. श्रेया चला हवा येऊ द्या कार्यक्रमामुळे सर्वत्र लोकप्रिय आहे. कार्यक्रमातील तिच्या अभिनयाचे आणि भूमिकांचे नेहमीच कौतुक केले जाते. कार्यक्रमात श्रेया अनेक मराठी तसेच हिंदी कलाकारांची हुबेहुब मिमिक्री करण्यासाठी विशेष ओळखली जाते. यामध्ये ती उषा नाडकर्णी यांची मिमिक्री सगळ्यात भन्नाट करते. मात्र ही मिमिक्री केल्याने श्रेयाला थेट उषा नाडकर्णी यांचा कॉल आला होता. हा सगळा प्रसंग तिने ‘बस बाई बस’ या कार्यक्रमात सांगितला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

‘बस बाई बस’ कार्यक्रमात हा किस्सा सांगताना श्रेयाने सांगितले की, “मला उषाताईंचा फोन आला. मला फोन का आला हे लगेच समजले मी फोन घेतला आणि म्हणाले तुला काय बोलायच ते बोल, मला माहितेय माझ्याकडून चूक झाली. मी अशी पुन्हा चूक कधीच करणार नाही. यावर उषा नाडकर्णी यांनी काय झालं गं, अगं बरं केलंस तू, छान करतेस. मी काही ते बघितलं नाही. मला कुणीतरी फोन केला,अगं ती श्रेया बुगडे तुझं करतीये बघ. म्हणून मी बघितलं. छान करतेस तू. दुसरं कुणी केलं ना तर ते नाही मी खपवून घेणार,” अशी प्रतिक्रिया दिली. श्रेयाने खास त्यांच्याच अंदाजात सांगितलेला हा किस्सा ऐकून सगळेच हसायला लागले. कार्यक्रमाचा हा प्रोमो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा- वनपीसमध्ये मौनीच्या मनमोहक अदा, पाहताक्षणीच पडाल प्रेमात!
अरेरे! फातिमा सना शेखने विकी कौशलसोबत केले असे काही, व्हिडिओ तुफान व्हायरल
मोनालिसाच्या हॉटनेसने केले घायाळ

Latest Post