बॉलिवूड आणि टॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू अभिनयापेक्षा जास्त तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असते. लोक देखील तिला जोरदार ट्रोल करत असतात. परंतु तिच्या वक्तव्याने ती सगळ्यांची बोलती बंद करत असते. अशातच तापसीचा एक व्हिडिओ साेशल मीडियावर चांगलाच व्हायरल हाेत आहे, ज्यात फाेटाेग्राफर तापसीला प्रश्न विचारताे.
झाले असे की, फाेटाेग्राफर्सने तापसी पन्नू (Taapsee Pannu) हिच्यासमाेर फार गर्दी केली होती. तिला काॅमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या निधनावर प्रश्न विचारण्यात आला होता. प्रश्नावर तापसी म्हणाली, “काय बाेलू??” तापसीला जेव्हा वाटेतून जाण्यास अडचण हाेऊ लागली, त्यावेळी तिने जाण्यासाठी जागा सोडायला लावली. ती म्हणाली, “बाजूला व्हा, असं करू नका, थाेडं सरका.” यानंतर ती ‘धन्यवाद’ बाेलून तेथून निघून गेली.
तापसीबद्दल या व्हिडिओवर वेगवेगळ्या कमेंट येत आहे. एका युजरने कमेंट करत लिहिले की, “तापसी आता गर्विष्ठ झाली.” तापसीच्या एका चाहत्याने कमेंट करत लिहिले की, “अभिनेत्रीला अशाप्रकारे घेरले, तर ती अस्वस्थ हाेणारंच ना.”
या आधी तापसी एका पुरस्कार साेहळ्यात मीडियावर संतापली हाेती. जेव्हा पॅपराजीने म्हटले हाेते की, “तिचा चित्रपट ‘दाेबारा’ला समीक्षकांनी नकारात्मक रिव्यू दिला.” तापसी पहिले सर्वांना म्हणते की, “ओरडू नका! नाहीतर हे म्हणतील अभिनेत्रीमध्ये माणूसकी नाही. यानंतर पत्रकार प्रश्न विचारताे, तेव्हा तापसी म्हणते की, “पहिले गृहपाठ करून या आणि मग मला प्रश्न विचारा.”
तापसीच्या वर्कफ्रंटविषयी बाेलायचे झाले, तर तापसी शेवटची ‘दाेबारा’ चित्रपटात दिसली हाेती. आता तापसी ‘ब्लर’, ‘वाे लडकी है कहा’ आणि ‘डंकी’ या चित्रपटात दिसणार आहे. ‘डंकी’ चित्रपटाविषयी बाेलायचे झाले, तर हा चित्रपट राजकुमार हिरानी बनवत आहे. या चित्रपटात तापसीबराेबर शाहरुख खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटादरम्यान शाहरुख आणि तापसी पहिल्यांदा रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘नेहा कक्करला 8 वर्षांसाठी तुरुंगात डांबा’, गायिका का होतेय ट्रोल? कारण घ्या जाणून
पत्रकार विचारत होता प्रश्न, तेवढ्यात अचानक रागाने ओरडला सनी देओल; उपस्थितांमध्ये पसरली भयान शांतता
‘माझ्या गाडीचा ब्रेक फेल केला, विष देऊन मारण्याचाही प्रयत्न झाला…’ अभिनेत्री तनुश्री दत्ताचा खळबळजनक खुलासा