Monday, July 1, 2024

बॉयफ्रेंड असावा तर असा! तेजस्वीने डोकं फोडून घेतल्यानंतर करणने ‘अशी’ घेतली काळजी, व्हिडिओ व्हायरल

छोट्या पडद्यावरील रोमँटिक जोडपे म्हणून तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा यांना ओळखले जाते. त्यांच्यातील केमिस्ट्री चाहत्यांना भलतीच आवडते. ते दोघेही एकमेकांवर जीवापाड प्रेम करतात. याचा प्रत्यय अनेकदा त्यांच्या व्हायरल व्हिडिओंमधून आला आहे. त्यांचे फोटो आणि व्हिडिओ काही वेळातच सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असतात. अशात त्यांचा नुकताच एक व्हिडिओ समोर आला आहे, जो चाहत्यांच्या पसंतीस पडला आहे.

तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) सध्या ‘नागिन ६’ या मालिकेत झळकत आहे. या मालिकेतील तिच्या पात्राला चाहत्यांकडून जोरदार पसंती मिळत आहे. नुकतेच या मालिकेच्या शूटिंगदरम्यान तिच्या डोक्याला दुखापत झाली. यानंतर तिचा बॉयफ्रेंड करण कुंद्रा (Karan Kundrra) याने तिची काळजी घेतली. त्याने तिच्या डोक्यावर बर्फ लावला. तेजस्वीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवरही याचा व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओत दिसते की, कशाप्रकारे करणने तिच्या जखमेवर बर्फ लावला आहे. यादरम्यान ते दोघेही जोरात मस्ती करतानाही दिसत आहेत.

तेजस्वीच्या दुखापतीवर व्यक्त होतायत चाहते
तेजस्वी प्रकाशचा हा व्हिडिओ समोर येताच तिचे चाहते त्यांच्या आवडत्या अभिनेत्रीची काळजी करू लागले आहेत. व्हिडिओमध्ये तेजस्वी हसतानाही दिसत आहे, त्यानंतर चाहते तिला वेडी म्हणत आहेत. एका युजरने कमेंटमध्ये लिहिले की, “डोकं फोडून घेतलंय आणि कार्टून वरून हसत आहे.” दुसरा एकजण म्हणाला, “काय वेडी मुलगी, किती जोरात तुझं डोकं फोडलंस.” त्याचवेळी, एकाने कमेंटमध्ये म्हटले की, “काय वेडी मुलगी, स्वतःची काळजी घेत नाही आणि वरून हसत आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by @kk._.admirer

बिग बॉसमध्ये झाली होती दोघांची बेट
टीव्हीवरील प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक असलेल्या तेजस्वी आणि करण हे ‘बिग बॉस १५’मध्ये एकमेकांच्या प्रेमात पडले होते. तेजस्वीच्या क्यूटनेसवर करण भाळला होता. ते आधी मित्र बनले आणि नंतर त्यांच्यात प्रेमाची पालवी फुटली. दोघेही कपल गोल्स देण्यात कधीही मागे नसतात. ते नेहमीच पॅपराजींच्या कॅमेऱ्यात कैद होतात. आता त्यांचे चाहते या दोघांच्या लग्नाची वाट पाहत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-
दिशाचा ‘हा’ व्हिडिओ पाहून टायगर श्रॉफही होईल फिदा, तुम्हीही पाहा अभिनेत्रीचा सिझलिंग अंदाज
आख्ख्या जगाने काढलेली आठवण एकीकडे अन् पोटच्या लेकीने काढलेली आठवण दुसरीकडे, जान्हवीची भावूक पोस्ट व्हायरल
भयंकर! 15 वेळा हॉरर चित्रपट पाहिल्यानंतर स्वतःलाच समजू लागला भूत, पेटवून घेत केली आत्महत्या

हे देखील वाचा