Friday, April 19, 2024

‘या’ कारणामुळे करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाशच्या मागे लागले पॅपराजी, व्हिडिओ व्हायरल

अभिनेत्री तेजस्वी प्रकाश Itejjaswi prakash) सध्या तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात खूप चांगल्या टप्प्यातून जात आहे. एकीकडे तेजस्वीला सध्या अनेक ऑफर्स आहेत, तर दुसरीकडे, करण कुंद्रासोबतचे (karan kundra) तिचे लव्ह लाईफ सुद्धा रुळावर आहे. या कपलची केमिस्ट्री आणि बाँडिंग सगळ्यांनाच आवडतंय की प्रत्येकजण या कपलच्या लग्नाच्या तारखेची वाट पाहत आहे. आता करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे जो खूप वेगाने व्हायरल होत आहे.

तेजस्वी प्रकाश पॅपाराझींसमोर सुंदर अभिनय करताना दिसत आहे आणि तिची शैली चाहत्यांना खूप आवडते. पुन्हा एकदा पॅपराझींनी तिला आणि करण कुंद्राला रात्री उशिरा मुंबईत पाहिले. यावेळी तेजस्वीने ब्रॅालेट टॉप घातला होता. तेजस्वी या रिव्हलिंग टॉपमध्ये खूपच अस्वस्थ वाटत होती. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तेजस्वीला कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी पॅपराझी त्याच्या मागे धावत होते आणि तेजस्वी ड्रेस हाताळताना त्यांना टाळताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे तेजस्वीची अशी स्टाईल पहिल्यांदाच समोर आली नाही, तर दररोज तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्राची अधिक बोल्ड आणि रोमँटिक स्टाइल पाहायला मिळते.

करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश ही जोडी चाहत्यांना खूप आवडते, तर आता सर्वांना त्यांच्या लग्नाचीही प्रतीक्षा आहे. करणला नवरा आणि तेजस्वीला नवरी बनताना पाहण्यासाठी त्याचे चाहते अधीर झाले आहेत आणि विशेष म्हणजे करणने चाहत्यांना खुशखबर दिली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

सीन इतका इंटिमेट की, काजल आग्रवालला न सांगतच रणदीप हुड्डाने केले किस, वाचा पुढे काय झाले?

रणबेलिया निघाले भुर्रर्र! प्रेग्नंसीमध्ये पूर्ण बदललीय आलिया, विमानतळावरील अभिनेत्रीचा व्हिडिओ व्हायरल

अमिषासोबत फोटोत दिसणाऱ्या ‘या’ अभिनेत्याला ओळखलं का? जगातल्या हँडसम अभिनेत्यांमध्ये होते त्याची गणना

 

हे देखील वाचा