Thursday, June 13, 2024

‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीनं ‘आदिपुरुष’मध्ये साकारली शूर्पणखाची भूमिका; म्हणाली…

बाहुबलीच्या यशानंतर साऊथचा सुपरस्टार प्रभास प्रसिद्धीतीच्या झोतात आला. आता त्याचा बहुचर्चित चित्रपट ‘आदिपुरुष‘ प्रदर्शित झाला आहे. शुक्रवारी (16 जून) प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची कथा रामायणावर आधारित आहे. हा चित्रपट बनवण्यासाठी खूप खर्च केल्याचे म्हटले जात आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे.

हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची थिएटरमध्ये प्रचंड गर्दी होत आहे. या चित्रपटाच अभिनेता प्रभासने रामची भूमिका साकारली आहे. तर क्रिती सेनॉनने जानकीची, सैफ अली खानने रावनाची आणि सनी सिंगने लक्ष्मणची भूमिका साकारली आहे. या चित्रपटातील काही कलाकार पाहून प्रेक्षकांना धक्काच बसला आहे. आदिपुरुषमध्ये (Adipurush) शूरपंखेची भूमिका मराठी अभिनेत्रीने साकारली आहे. शूरपंखेची भूमिका साकारणारी ही अभिनेत्री तेजस्विनी पंडित आहे.

शूर्पणखाच्या भूमिकेत अभिनेत्री तेजस्विनी पंडितला पाहून तिचे चाहते आनंदी झाले आहेत. तेजस्विनीसोबत या चित्रपटात देवदत्त नागे, नेहा खान यांसारखे मराठी कलाकार देखील आहेत. देवदत्त नाग यांनी आदिपुरुषमध्ये काम केले आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्येही तेजस्विनीचा लूक पाहायला मिळाला नाही. तेजस्विनी पंडितची भूमिका प्रदर्शनापूर्वी कुठेच दिसली नाही.

तेजस्विनी पंडितच्या भूमिकेबद्दल कमालीचे गुपित पहायला मिळाले आहे. विशेष म्हणजे ती कोणत्याही प्रमोशनल इव्हेंटमध्येही दिसली नाही. तेजस्विनीने आत्तापर्यंत रोमँटिक, सोज्वळ आणि मुख्य नायिकेची भूमिका साकारताना प्रेक्षकांना पहिले आहे. पण प्रेक्षकांची लाडकी तेजू आदिपुरुषमध्ये क्रुर भूमिका साकारताना दिसत आहे. ती या सिनेमात दिसेल अशी कल्पना चाहत्यांना अजिबात नव्हती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tejaswwini (@tejaswini_pandit)

काही दिवसांपुर्वी तेजस्विनीने इन्स्टाग्रामवर स्टोरीमध्ये आदिपुरुषचे पोस्टरही शेअर केले होते. त्यामुळे चाहते खूप उत्सुक होते की नेमकी ती कोणत्या भूमिकेत झळकणार आहे. नुकताच चित्रपट प्रदर्शित झाला आणि या गोष्टीचा उलगडा झाला आहे. तिने सोशल मीडियावर तिचे फोटो देखील शेअर केले आहेत. त्यामध्ये तिने निळ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत. त्या लूकमध्ये ती फार सुंदर दिसत आहे. (Actress Tejaswini Pandit played an important role in the movie Adipurush)

अधिक वाचा-
फुटबॉलपटू बाबू बेमिसाल! ‘चिडियाखाना’मधील ‘हा’ छोटा खलनायक मिळवतोय प्रेक्षकांची दाद
‘ये चाँद सा रौशन चेहरा’, हिना खानचा क्लासी लूक पाहिलात का?

हे देखील वाचा