Thursday, June 13, 2024

‘आदिपुरुष’ पाहताना ‘हनुमानजींच्या’ सीट शेजारी बसण्यासाठी खिसा करावा लागणार रिकामा? निर्माते म्हणाले, ‘आम्ही…’

अभिनेता प्रभास, क्रिती सेनन आणि सैफ अली खान यांचा चित्रपट ‘आदिपुरुष‘ 16जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट हिंदीसोबतच तेलुगू, तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेतही प्रदर्शित होणार आहे. ऍडव्हान्स बुकिंगही सुरू झाले आहेत. ओम राऊत यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटाला प्रेक्षक चांगला प्रतिसाद देत आहेत. ट्रेलर रिलीज झाल्यापासून चाहते या चित्रपटासाठी उत्सुकतेने वाट पाहताना दिसत आहेत. हा चित्रपट सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेचा विषय ठरत आहे.

‘आदिपुरुष’ (Adipurush) हा रामायणावर आधारित चित्रपट आहे, ज्यामध्ये साऊथ सुपरस्टार प्रभास राघवची भूमिका साकारत आहे. क्रिती सेनॉन (Kriti Sanon) जानकीच्या भूमिकेत असून सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत आहे. 2023चा हा बहुप्रतिक्षित चित्रपट आहे. या चित्रपटासाठी निर्मात्यांनी पाण्यासारखा पैसा खर्च केल्याचे सांगण्यात येत आहे. या चित्रपटाच्या निर्मितीसाठी सुमारे 500 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.

‘आदिपुरुष’ चित्रपटाचे प्रमुख आकर्षण हे हनुमान आहे. निर्मात्यांनी या विषयी माहिती दिली होती की, प्रत्येक थिएटरमध्ये ‘हनुमानजी’ यांच्या नावाने एक सीट ठेवले जाणार आहे. हा चित्रपट पाहताना तुम्हाला हनुमानजींच्या शेजारी बसून हा चित्रपट पाहता येणार आहे. त्यावेळची मज्जा काही वेगळीच असणार आहे. तुम्हाला आवडेल का? हनुमानजीच्या शेजारी बसुन चित्रपट पाहायला? पण हनुमान जी शेजारी बसुन चित्रपट पाहण्यासाठी तुम्हाला अधिक पैसे मोजावे लागणार आहेत, अशी चर्चा सुरू आहे. मात्र या सगळ्या अफवा आहेत. सर्वांना सारखेच पैसे मोजावे लागणार आहेत, अशी माहिती चित्रपटाच्या निर्मात्यांनी दिली आहे.

दरम्यान, नॅशनल मल्टिप्लेक्समध्ये सुमारे 18 हजार तिकिटांचे बुकिंग झाले आहेत. येत्या दोन दिवसांत हा आकडा आणखी वाढेल. थिएटरमध्ये ‘हनुमानजी’च्या जवळच्या सिटची सध्या चर्चा सुरू आहे. कोणत्या हनुमान भक्ताला ‘हनुमानजी’च्या शेजारी बसून चित्रपट पाहण्याची संधी मिळेल? याबाबत आतापासूनच चर्चा सुरू झाली आहे. (The makers said double the money needed to book a seat next to Hanumanji while watching the movie ‘Adipurush’)

अधिक वाचा-
हिंदी चित्रपटातील पहिली अभिनेत्री होती ‘पद्मिनी’, भारत-चीन युद्धादरम्यान केले होते ‘हे’ खास काम । Padmini Birthday
करण जोहरच्या कुटुंबातील ‘या’ व्यक्ती केलं होतं 5 वेळा लग्न; जाणून घ्या कोण आहे ती व्यक्ती 

हे देखील वाचा