Thursday, November 21, 2024
Home बॉलीवूड ट्विंकल खन्नाने शेअर केला आई डिंपल कपाडिया यांच्यासोबतचा बालपणीचा फोटो, चाहत्यांना विचारला अनोखा प्रश्न

ट्विंकल खन्नाने शेअर केला आई डिंपल कपाडिया यांच्यासोबतचा बालपणीचा फोटो, चाहत्यांना विचारला अनोखा प्रश्न

अभिनेत्री ट्विंकल खन्ना अनेकदा तिच्या जुन्या आठवणी आणि विचार सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. कधी कल्पना शेअर करताना, तर कधी अक्षय कुमारचे जुने फोटो शेअर करत त्याला खेचताना दिसत असते. नुकताच ट्विंकलने तिच्या बालपणीचा एक थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती तिची आई डिंपल कपाडिया यांच्यासोबत लहान मुलीच्या रुपात दिसत आहे. फोटोमध्ये ट्विंकलची बहीण रिंकी खन्ना डिंपल कपाडिया यांच्या मांडीवर बसलेली आहे.

ट्विंकलने (Twinkle Khanna) तिच्या थ्रोबॅक फोटोसोबत ऑगस्टे रॉडिनच्या प्रसिद्ध कांस्य पुतळ्याचा ‘द थिंकर’चा फोटोही शेअर केला आहे. ट्विंकलने या फोटोसोबत एक विचित्र कॅप्शन दिले आहे. ज्याबद्दल चाहत्यांच्या मनात विविध प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत.

ट्विंकलने चाहत्यांना विचारला एक अनोखा प्रश्न

पोस्ट शेअर करताना ट्विंकलने लिहिले की, “कोण चांगली पोझ देत आहे? माझे उत्तर आहे, रॉडिन द थिंकर, पण मी जास्त गोंडस होते. तुम्ही तुमचे मतही मांडू शकता. माझे मित्रही मेसेज करत असल्याने आणि प्रश्न विचारत असल्याने मी हे स्पष्ट करते की, ही पोझ स्पर्धा आम्हा तिघांची ‘रॉडिन द थिंकर’ सोबत आहे.”

ट्विंकल खन्नाची आई डिंपल कपाडिया यांच्यावर नेटकरी झाले फिदा

ट्विंकलच्या चाहत्यांसोबतच सेलेब्सही कमेंट करून आपले प्रेम व्यक्त करत आहेत. मलायका अरोरा थ्रोबॅक फोटोला सुंदर म्हणाली, तर टिस्का चोप्रा म्हणाली की, “इतके सुंदर आणि चांगले कपडे घातलेले!” दुसरा चाहत्याने लिहिले की, “मम्मी नेहमीपेक्षा चांगली पोझ देते.” आणखी एकाने लिहिले, “सॉरी… डिंपल कपाडिया यांच्या सौंदर्यापलीकडे कोणीही पाहू शकत नाही!”

डिंपल कपाडिया यांच्या स्टाइलचे चाहत्यांनी केले कौतुक 

ट्विंकलच्या एका चाहत्याने लिहिले की, ”तुम्ही उत्तम पोझ देऊ शकता हे नक्की, पण तुमची आईही डोळ्यात पाहत अभिनय करू शकते.” डिंपल कपाडिया यांचा आणखी एक चाहता म्हणाला की, “पोझिंग आणि स्टाईलमध्ये तुमच्या आईला कोणीही हरवू शकत नाही. माफ करा!”

डिंपल अजूनही अभिनेत्री म्हणून सक्रिय आहेत, तर त्यांच्या दोन मुली ट्विंकल आणि रिंकी यांनी काही काळ चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर ते सोडले. काही काळापूर्वी ट्विंकल खन्ना तिच्या आईबद्दल म्हणाली होती की, राजेश खन्ना यांच्यापासून विभक्त झाल्यानंतर ती सिंगल मदर आहे. त्यामुळे गरजेपोटी तिने अभिनय सुरू ठेवला.(actress twinkle khanna shares childhood photo with mother dimple kapadia asks fans a unique question)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
जेव्हा ट्विंकल खन्नाच्या आईने अक्षय कुमारला ‘गे’ समजले तेव्हा लग्नाआधी अभिनेत्यासमोर ठेवली मोठी अट

‘मी पत्नीच्या आयुष्यात ढवळाढवळ करत नाही’ अभिनेता अक्षय कुमारने ट्विंकल खन्नाबद्दल केला मोठा खुलासा

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा