‘बिग बॉस’ फेम प्रसिद्धी पिपासू अभिनेत्री उर्फी जावेद ही नेहमीच चर्चेत असते. सिनेमात काम न करताही तिने खूप मोठा चाहतावर्ग कमावला आहे. ती तिच्या कामाव्यतिरिक्त सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय असते. तिची खासियत म्हणजे, ती तिच्या आगळ्या वेगळ्या फॅशन सेन्सने चाहत्यांचे लक्ष वेधत असते. कधीकधी तिला तिच्या फॅशनमुळे ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. तसेच, कधीकधी तिच्यावर विचित्र ड्रेसमुळे चारचौघात फजिती होण्याचीही वेळ येते. असेच काहीसे आताही घडले आहे. तिचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत उर्फी जावेद (Urfi Javed) हिचा ड्रेस तिला सांभाळता येत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे उर्फी ऊप्स मोमेंटची शिकार (Urfi Javed Oops Moment) झाली आहे. नेमकं उर्फीसोबत काय घडले, हे आपण जाणून घेऊया…
बोल्डनेस उर्फीच्या अंगलट
ज्या व्हिडिओमुळे उर्फीची पंचायत झाली आहे, त्या व्हिडिओत ती छोटे-छोटे तुकडे शिवून बनवलेल्या ड्रेसमध्ये दिसत आहे. याव्यतिरिक्त तिचा ड्रेस दोन दोरींच्या आधारावर आहे. तसेच, तिने ड्रेसखाली एक स्लिट परिधान केली आहे, जी गरजेपेक्षा जास्त लांब आहे, त्यामुळे तिचे अंतर्वस्त्रही दिसत आहे. सतत नेटकऱ्यांच्या निशाण्यावर येणाऱ्या उर्फीचा हा व्हिडिओ पाहून प्रत्येकाच्या भुवया उंचावल्याचे दिसत आहे.
हवेत उडला ड्रेस की, सांभाळताना आल्या नाकी नऊ
उर्फी जावेद या व्हिडिओत कॅमेऱ्यासमोर पोझ देताना दिसत आहे. तसेच, ती मध्येच एकदम पायऱ्यांवरून धडपडताना दिसली. हवा खूप जोरात होती आणि जेव्हा उर्फीचा पांढऱ्या रंगाचा ड्रेस हवेत असा उडाला की, तिला तो सांभाळताच आला नाही. त्यामुळे उर्फी ऊप्स मोमेंटची शिकार झाली. व्हिडिओत दिसते की, यावेळी ती आपल्या टीमला विचारत आहे की, काही गडबड तर झाली नाही ना. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. तिच्या या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लाईक्स मिळाले आहेत. नेटकरीही कमेंट करून तिला ट्रोल करत आहेत.
View this post on Instagram
एकाने कमेंट करत लिहिले की, “एवढे मोठे हील्स घालून चालता येत नाही, तर घालतेच कशाला.” दुसऱ्या एकाने लिहिले की, “यार ही दररोज असे कपडे घालून जाते तरी कुठे?” आणखी एकाने कमेंट केली की, “कोण आहे रे ही. इंस्टाग्राम उघडलं केलं की, सगळीकडे हीच दिसते.”
उर्फीच्या चाहत्यावर्गाबद्दल बोलायचं झालं, तर तिला इंस्टाग्रामवर 36 लाखांहून अधिक चाहते फॉलो करतात. तिच्या प्रत्येक पोस्टला लाखो लाईक्स मिळतात. कदाचित त्यामुळेच तिची प्रत्येक पोस्ट जोरदार व्हायरल होत असते.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
म्हणून ‘या’ पाकिस्तानी अभिनेत्याला करता आले नाही बॉलिवूड पदार्पण, मिथुन चक्रवर्तीचा मुलगा होता कारण?
अभिनेत्री अलका कुबल आणि प्रिया बेर्डे अडचणीत, दहा वर्षापुर्वीच्या खटल्यात भरावा लागणार दहा लाखांचा दंड
‘सिटाडेल’मधील अॅक्शन सीनबद्दल प्रियांकाचा मोठा खुलासा; म्हणाली, ‘गणित तितकेच सोपे…’