म्हणून ‘या’ पाकिस्तानी अभिनेत्याला करता आले नाही बॉलिवूड पदार्पण, मिथुन चक्रवर्तीचा मुलगा होता कारण?

0
90
Mithun-Chakraborty-And-Farhan-Saeed
Photo Courtesy: Instagram/farhan_saeed

फक्त भारतीयच नाहीत, तर पाकिस्तानी अभिनेते आणि गायकांचाही भलामोठा चाहतावर्ग आहे. ते आपला देश सोडून जगभरात प्रसिद्ध आहेत. यापैकीच एक पाकिस्तानी अभिनेता आणि गायक आहे, फरहान सईद. त्याचाही मोठा चाहतावर्ग आहे. त्याने बॉलिवूडसाठी गाणे गायले, पण त्याला हिंदी सिनेमात काम करता आले नाही. विशेष म्हणजे, फरहान बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार होता, त्याच्याशी करारही करण्यात आला होता. मात्र, छोट्याशा कारणामुळे शूटिंगच्या आधीच फरहानचे पदार्पण रद्द झाले. काय होते कारण, चला जाणून घेऊया…

भारतामध्ये छोट्याशा कारणावरून रद्द झाले फरहानचे पदार्पण
अभिनेता फरहान सईद (Farhan Saeed) हा नुकताच ‘सुनो चंदा’ आणि ‘मेरे हमसफर’ यांसारख्या पाकिस्तानी ड्रामामध्ये दिसला आहे. फरहान काही वर्षांपूर्वी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार होता. त्याने एका मुलाखतीत सांगितले की, काही वर्षांपूर्वी तो मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांचा मुलगा मिमोह (Mimoh) याच्यासोबत एका सिनेमात काम करणार होता. मात्र, ऐनवेळी त्याचे पदार्पण रद्द झाले.

कारण धक्कादायक
फरहान हा बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) हिच्यासोबत पदार्पण करणार होता. या दोघांनाही या सिनेमासाठी नक्की करण्यात आले होते. आपल्या एका मुलाखतीदरम्यान स्वत: फरहानने सांगितले आहे की, ‘तो आणि उर्वशी सिनेमा करण्यासाठी तयार होते. मात्र, शेवटच्या क्षणी, एका फोन कॉलमुळे दोघांनीही निर्णय घेतला की, ते सिनेमात काम करणार नाहीत.’ दोघांनाही वाटले की, मिथुन यांच्या मुलासोबत सिनेमात काम करणे त्यांच्यासाठी योग्य सुरुवात नाहीये.

 

View this post on Instagram

 

A post shared by Farhan Saeed Butt (@farhan_saeed)

अनेक वर्षांपूर्वी झालेल्या या घटनेनंतर फरहानने आजपर्यंत हिंदी सिनेमात काम केले नाही. मात्र, गायक म्हणून त्याने ‘हाफ गर्लफ्रेंड’ या सिनेमातील ‘तू थोडी देर’ हे गाणे श्रेया घोषाल हिच्यासोबत गायले आहे. याव्यतिरिक्त त्याने ‘सजनी’, ‘हलका हलका सुरूर’ यांसारखी गाणीही गायली आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-

अभिनेत्री अलका कुबल आणि प्रिया बेर्डे अडचणीत, दहा वर्षापुर्वीच्या खटल्यात भरावा लागणार दहा लाखांचा दंड
‘सिटाडेल’मधील अ‍ॅक्शन सीनबद्दल प्रियांकाचा मोठा खुलासा; म्हणाली, ‘गणित तितकेच सोपे…’
अबब! अक्षय कुमारने ‘इतक्या’ कोटींला विकला मुंबईमधील बंगला, परदेशातील संपत्ती पाहून होतील डोळे पांढरे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here