अभिनेत्री उर्फी जावेद कोणत्याही वस्तूपासून बनवलेला ड्रेस घालू शकते हे सर्वांनाच माहिती आहे, पण दिवाळीच्या दिवशी उर्फीने टॉपलेस व्हिडिओ शेअर करून सर्वांना आश्चर्यचकित केले. उर्फीने स्वीट खात टॉपलेस आणि लाॅग स्कर्ट परिधान करुण चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. मात्र, त्यानंतर उर्फी सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल झाली. छाेट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘अनुपमा‘ मधील वनराज म्हणजेच सुधांशू पांडे यालाही उर्फीची शैली आवडली नाही आणि रागाच्या भरात त्याने अभिनेत्रीला हीन म्हटले. अभिनेत्याच्या या कमेंटमुळे संतप्त झालेल्या उर्फीने इंस्टाग्राम स्टोरीवर एक टीप लिहून योग्य उत्तर दिले आणि त्याला स्वत:ची मालिका पाहण्याचा सल्ला दिला.
उर्फी जावेद (urfi javed) नियमित सोशल मीडियावर सक्रिय असते. ती तिचे नवनवीन ड्रेसिंग सेन्सचे फाेटाे आणि व्हिडिओ चाहत्यांसाेबत शेअर करते. मात्र, अनेकदा साेशल मीडिया युजर्स उर्फीला ट्राेल करत असल्याचे बघायला मिळते. दिवाळीतील उर्फीच्या ड्रेसबद्दल सुधांशूने इंस्टा स्टोरीवर लिहिले की, “मी तिला फॉलो करत नाही, तरीही मला अशा वाईट गोष्टी रोज पाहायला मिळतात. हे सर्व पाहून मला राग येतो.”

उर्फीने ही बातमी आपल्या अधिकृत इन्स्टा स्टोरीवर शेअर केली आणि नंतर एक नोट लिहून सुधांशू पांडे यांना टॅग करत योग्य उत्तर दिले. उर्फीने लिहिले की, ‘द आयरनी, अनुपमा ही महिला सशक्तीकरणाचा शो आहे. जिथे स्त्री समाजात बनवलेले रूढी मोडते असे दाखवले आहे. तू तुझा शो का बघत नाहीस सुधांशू? कदाचित काहीतरी शिकला असता.

इतकेच नाही तर उर्फीने तिच्या इन्स्टा स्टोरीवर तिच्या अनेक फाेटाेचे रील बनवले आणि शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले, “माझी आई म्हणते ते ठीक आहे.”
उर्फी जावेदने 2016 मध्ये आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. मात्र, तीला ती लाेकप्रियता मिळाली नाही जी तिला तिच्या ड्रेसमुळे मिळाली. कधी टेपने बनवलेला ड्रेस, कधी ब्लेड तर कधी सिमकार्ड घालून ही अभिनेत्री सोशल मीडियावर व्हायरल होत असते. उर्फी गेल्या वर्षी ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये दिसली होती.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
अक्षय कुमार आणि रोहित शेट्टीमध्ये का झाली मारामारी? सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
अभिनेता नाही तर दिग्दर्शक, रितेश देशमुखचा नवीन चित्रपट वेड लवकरच…