Thursday, April 24, 2025
Home अन्य उर्वशी ढोलकिया वयाच्या १७ व्या वर्षी झाली जुळ्या मुलांची आई, सिंगल मदर बनून केला संकटांचा सामना

उर्वशी ढोलकिया वयाच्या १७ व्या वर्षी झाली जुळ्या मुलांची आई, सिंगल मदर बनून केला संकटांचा सामना

टेलिव्हिजनवर अनेक अभिनेत्री काम करून त्यांची ओळख निर्माण करतात. काही नायक म्हणून ओळख मिळवतात तर काही खलनायक म्हणून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवतात. अशीच एक अभिनेत्री जिने ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेतून ओळख निर्माण केली. ती म्हणजे कोमोलिका बसू हे पात्र निभावणारी अभिनेत्री उर्वशी ढोलकिया. तिचा अभिनय आणि पात्र एवढे गाजले की, लोक तिला तिच्या नावाने नाहीतर मालिकेतील कोमोलीका या नावाने जास्त ओळखतात. एकेकाळी टेलिव्हिजन गाजवलेली ही अभिनेत्री तिच्या अभिनयासोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील खूप चर्चेत राहिली आहे. चला तर जाणून घेऊया तिच्या वैयक्तिक आयुष्यातील काही खास गोष्टी.

माध्यमातील वृत्तानुसार उर्वशीचे (Urvashi dholkiya) लग्न ती केवळ १६ वर्षाची असताना झाले होते. एवढेच नाही तर ती १७ वर्षाची असताना तिला जुळी मुले देखील झाली होती. ती क्षितिज आणि सागर या दोन मुलांची आई झाली होती. लग्नाच्या दोन वर्षानंतर तिने तिच्या पतीला घटस्फोट दिला. परंतु त्यानंतर तिने परत लग्न केले नाही. तिने तिचे सगळे आयुष्य मुलांच्या जडणघडणीत घालवले. या सगळ्यात तिच्या कथित अफेअर्सबाबत खूप चर्चा होऊ लागल्या होत्या.

https://www.instagram.com/p/CZHMMOAoWrr/?utm_source=ig_web_copy_link

उर्वशी एका व्यावसायिकासोबत रिलेशनमध्ये आहे अशा चर्चा होऊ लागल्या होत्या. एकदा एका मुलाखतीत उर्वशीने सांगितले होते की, “हा व्यावसायिक कोण आहे आणि कुठे असतो? एकदा मला पण भेटावा त्याला. ही काही मस्करी नाहीये. मी सिंगल मदर आहे. काम करता करता मुलांकडे लक्ष द्यावे लागते. माझ्यावर काही जबाबदाऱ्या आहेत आणि असल्या गोष्टींचा विचार करण्यासाठी माझ्याकडे वेळ नाहीये.”

तिने केलेल्या या वक्तव्यानंतर मात्र सगळेजण गप्प झाले होते. परंतु तिच्याबाबत अनेक अफवा पसरत होत्या. सिंगल मदर असल्याने तिला अशा अनेक गोष्टींना सामोरे जावे लागले आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा