×

अनुष्काने पोस्ट शेअर करत केला त्यांच्या झोपण्याच्या वेळेचा खुलासा, म्हणुनच आहे ‘विरूष्का’ फिट अँड फाईन

भारतीय क्रिकेटर विराट कोहली आणि बॉलीवूड एक्ट्रेस अनुष्का शर्मा बॉलिवूडमधील सगळ्याच हॉट आणि मादक कपल्स पैकी एक आहेत. दोघे पण आपापल्या क्षेत्रात आघाडीवर असून, ते कायमच आपल्या फिटनेसमुळे चर्चेचा विषय बनतात. सध्या अनुष्का तिच्या पतीसोबत दक्षिण आफ्रिकेमध्ये असून, तिथून तिने सोशल मीडियावर एक मजेदार सेल्फी शेअर केला आणि सोबतच तिने विराटचे एक महत्वाचे सिक्रेट देखील शेअर केले. ज्यामुळे ही जोडी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. अनुष्का आणि विराट नेहमी आपल्या आयुष्याशी निगडित अनेक खास गोष्टी, किस्से फॅन्ससोबत शेअर करताना दिसतात. एवढंच नाही तर तिने तिच्या पोस्टमधून विराट कोहली याच्या झोपण्याच्या सवयींबद्दलचा रंजक खुलासा केला असून, ही पोस्ट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

अनुष्काने विराट सोबतचा एक न पाहिलेला फोटो शेअर करून त्याच्या दैनंदिन दिनचर्ये संबंधित एक गुपित उघड केलं आहे. तिने शेअर केलेल्या फोटोसोबत जे कॅप्शन दिले आहे ते त्यांच्या बेडरूमशी निगडित असल्याने सर्वच नेटकरी आश्चर्यचकित झाले आहे. अनुष्काने तिच्या इन्स्टा स्टोरीवर तिचा आणि विराटचा एक सेल्फी शेअर करत लिहिले, “कोण बेडवर ९.३० वाजता झोपायला जाते?” या कॅप्शनमागचा खरा अर्थ फिटनेस प्रेमींच्या लगेचच लक्षात आला आहे. अनुष्का आणि विराट दोघांचाही रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठण्यावर विश्वास आहे. जे लोकं असे करतात त्यांना नक्कीच उत्तम आरोग्य, हुशारी मिळते. हे तत्व ते त्यांच्या रोजचं आयुष्यात देखील पाळताना दिसतात.

Photo Courtesy: Instagram/anushkasharma

त्यांनी हे सुद्धा सांगितलं की रोजच्या सवयी आणि शिस्तबद्ध जीवनशैलीमुळेच विराट एक सर्वोत्कृष्ट क्रिकेटर बनला. विराट हा पंजाबी कुटुंबातून येत असल्याने त्याला देखील पराठे आणि तळलेले पदार्थ आवडतात. मात्र आपल्या उत्तम आरोग्यासाठी तो हे खाणे टाळतो. फिटनेसच तुम्हाला निरोगी, मोठे आणि उत्तम जीवन देयेईल यावर ते दोघेही विश्वास ठेवत असल्याने ते स्वतः त्यांच्या आयुष्यात फिटनेससाठी खूपच कटिबद्ध दिसतात.

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आपल्या प्रभावी अभिनयाने प्रेक्षकांना नेहमीच भुरळ घालत असते. लग्नबंधनात अडकण्याआधी अनुष्काने भरपूर हिंदी चित्रपटात काम केले. लग्नानंतर देखील अनुष्काने फिल्म इंडस्ट्रीमध्ये खूप काम केले. पण आई झाल्यापासून ती चित्रपटांपासून काहीशी दूर गेली. सध्या अनुष्का शर्मा विराटसोबत आणि त्यांच्या मुलीसोबत वामिकासोबत जास्तीत जास्त वेळ घालवत असते. मात्र आता लवकरच अनुष्का तिच्या आगामी ‘चकदा एक्सप्रेस’ सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हेही वाचा-

Latest Post