×

‘सिर्फ तुम’, चित्रपटात मुख्य भूमिकेत असणारी प्रिया गिल आठवते का? आजही दिसते एकदम स्वीट अँड सिंपल

बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपट येतात आणि जातात पण काही चित्रपट हे प्रेक्षकांच्या मनावर इतके गारूड घालतात की, अनेक वर्ष हे चित्रपट स्मरणात राहतात. यातीलच एक चित्रपट म्हणजे संजय कपूर सुष्मिता सेन आणि प्रिया गिल यांचा ‘सिर्फ तुम’ हा चित्रपट १९९९ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात दोघांनी एक मेकांना कधीच पाहिले नाही. परंतु प्रेम एवढे होते की, त्यांनी ते प्रेम मिळवण्यासाठी सगळे प्रयत्न केले.

चित्रपटात दीपक आणि आरती यांची केमिस्ट्री सगळ्यांना खूप आवडली होती. ही पात्र संजय कपूर आणि प्रिया गिल निभावत होते. या पात्रांनी त्यांनी त्यांच्या चाहत्यांच्या मनात खास जागा बनवली होती. हा चित्रपट प्रदर्शित होऊन आता जवळपास २२ वर्ष झाले आहेत. अभिनेत्री प्रियाचा लूक देखील खूप बदलला आहे. चला तर पाहूया २२ वर्षानंतर कशी दिसते प्रिया गिल.

View this post on Instagram

A post shared by Priyanka Gill (@priyankagill_official)

सोशल मीडियावर प्रिया (priya gill) बऱ्यापैकी सक्रिय असते. अशातच तिचे काही नवीन फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. सिंपल लूक आणि बिना मेकअपमध्ये प्रिया आजही तेवढीच सुंदर दिसत आहे. तिच्या या सिंपल लूकवर तिचे चाहते सातत्याने कमेंट करत आहेत. तिच्या एका चाहत्याने या फोटोवर कमेंट केली आहे की, “तू खूप सुंदर आहे.” तर अनेक एकाने कमेंट केली आहे की, “तू अजिबात बदलली नाहीये.”

View this post on Instagram

A post shared by Priyanka Gill (@priyankagill_official)

प्रिया ही १९९५ साली ‘मिस इंडिया’ची फायनॅलिस्ट होती. तिने सलमान खान, शाहरुख खान, यांसारख्या कलाकारांसोबत काम केले आहे. प्रियाने बॉलिवूड व्यतिरिक्त भोजपुरी आणि मल्याळम चित्रपटात देखील काम केले आहे. तिने शेवटचे २००६ मध्ये ‘भैरवी’ या चित्रपटात काम केले आहे. तिने करिअरमध्ये काही खास काम केले नाही. परंतु तिने प्रेक्षकांच्या मनात तिचे अढळ स्थान निर्माण केले आहे.

हेही वाचा :

Latest Post