बाॅलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला गेल्या दिवसांमध्ये कधी भारतीय क्रिकेटर ऋषभ पंतमुळे, तर कधी पाकिस्तानी गोलंदाज नसीम शाहमुळे चर्चेत आहे. ऋषभ पंत आणि उर्वशी यांच्यात काही दिवसापासून साेशल मीडियावर वाद सुरू हाेता. मात्र, आता उर्वशी ऋषभबद्दल असे काही बाेलली आहे की, ज्याची खूप चर्चा हाेत आहे.
झाले असे की, उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) हिने ऋषभ पंत (Rishabh Pant) हिला ‘छोटू भैय्या’ म्हटले हाेते. उर्वशीने एका पोस्टमध्ये पंतला उद्देशून लिहिले हाेते, “छोटू भैय्याला बॅट बाॅल खेळायला पाहिजे, मी काेणती मुन्नी नाही डार्लिंग मुलासाठी बदनाम व्हायला. रक्षा बंधनच्या हार्दिक शुभेच्छा.” उर्वशीची ही पाेस्ट काही क्षणातच व्हायरल झाली हाेती. परंतु आता अभिनेत्रीने पंतला हात जोडून माफी मागितली आहे.
ऋषभ पंतसाेबत साेशल मीडियावर झालेल्या या वादानंतर उर्वशीला एका मुलाखतीत विचारण्यात आले की, तुम्ही ऋषभ पंतला काही मॅसेज देऊ इच्छिता का? यावर अभिनेत्री म्हणते, “सीधी बात नाे बकवास… म्हणून मी काही वाईट बाेलत नाहीये.” यानंतर उर्वशीला पुन्हा विचारण्यात आले की, ‘तू ऋषभ पंतला काही बाेलू इच्छिते, कारण तूच बाेलली हाेती माफ करा आणि विसरून जावा, मग तू त्याच्यापर्यंत काही पाेहोचवू इच्छिते का?’ यावर उर्वशी आधी बाेलते, “मी काहीही बाेलू इच्छित नाही.” मात्र, नंतर ती ऋषभ पंतला हात जाेडून माफी मागते. उर्वशी म्हणते, “मला माफ करा.”
View this post on Instagram
उर्वशीने पंतची माफी मागण्यावर चाहतेही आपली प्रतिकिया देत आहे. एका युजरने व्हायरल व्हिडिओवर लिहिले की, “आता आली लाईनीवर.” दुसऱ्या चाहत्याने लिहिले की, “सर्वकाही गोल माल आहे.”
झाले असे की, उर्वशी रौतेलाच्या एक मुलाखतीनंतर या दाेघांमध्ये कथित वाद सुरू झाला हाेता. उर्वशीने एका मुलाखतीमध्ये ऋषभ पंत याला टाेमणा मारत म्हटले हाेते की, “एका व्यक्तीने हाॅटेलच्या लॉबीमध्ये त्याची 10 तास वाट पाहिली हाेती.”
उर्वशीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर क्रिकेटर ऋषभ पंतने तिला उद्देशून एक इंस्टा स्टाेरी टाकली हाेती. ऋषभ पंतने नाव न घेता आपल्या इंस्टा स्टाेरीमध्ये लिहिले हाेते की, “पाठलाग साेडून दे.” मात्र, इंस्टा स्टोरीला शेअर केल्यानंतर काही वेळाने त्याने ते डिलीट केले हाेते.
ऋषभ पंतच्या या पाेस्टवर उर्वशी पण शांत बसली नाही. तिने क्रिकेटरला त्याच्या अंदाजामध्ये पाेस्ट शेअर करत प्रत्युत्तर दिले. अभिनेत्रीने ऋषभ पंतला ‘छाेटू भैय्या’ म्हटले. मात्र, आता उर्वशीने त्याची माफी मागितली आहे. आता पंत यावर काय प्रतिक्रिया देतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
आता ओटीटीवरही पाहता येणार रणबीर- आलियाचा ‘ब्रह्मास्त्र’, पण कोणत्या प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज?
‘ब्रह्मास्त्र’ सिनेमा हिट करायचा म्हणून सांगितले जातायेत चुकीचे आकडे? बजेटइतकी कमाई करणेही कठीण
महिमाने सगळ्यांसमोर आणलेली बॉलिवूडची काळी बाजू; म्हणालेली, ‘व्हर्जिन अभिनेत्री नसेल, तर…’