Thursday, March 28, 2024

आता ओटीटीवरही पाहता येणार रणबीर- आलियाचा ‘ब्रह्मास्त्र’, पण कोणत्या प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज?

गेल्या काही दिवसांपासून ‘ब्रह्मास्त्र‘ या चित्रपटाच्या जोरदार चर्चा सुरू होत्या. त्यामुळे प्रत्येकजण हा चित्रपट पाहण्यासाठी खूपच उत्सुक होता. हा चित्रपट 9 सप्टेंबर रोजी प्रेक्षकाच्या भेटीसाठी आला आणि प्रेक्षकांची उत्सुकता संपली. या चित्रपटाने प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर जोरदार कलेक्शन करून मोठमोठ्या चित्रपटांना मागे सोडले. बॉलिवूडची ‘डूबती नैय्या’ या चित्रपटाने पार लावली आहे. ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर लवकरच येण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

बॉलिवूडमध्ये काही दिवसापासून बॉयकॉट ट्रेंड सुरू झाल्यामुळे गाजणारे चित्रपटही फ्लॉप ठरले. मात्र, ‘ब्रह्मास्त्र’ (Brahmastra) चित्रपटाने बॉलिवूडला आधार दिला आहे. या चित्रपटाने हाती आलेल्या वृत्तानुसार, 100 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. या चित्रपामध्ये आलिया भट्ट (Alia Bhatt), रणबीर कपूर (Ranbir Kapoor), अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), नागार्जुन (Nagarjuna), आणि मौनी रॉय (Mouni Roy) यांसारखे मोठमोठे कलाकार या चित्रपटाचा भाग आहेत. ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट लोकांना एवढा आवडला आहे की, लोकांची चित्रपटगृहात गर्दी पाहून चित्रपटासाठी चाहत्यांमध्ये क्रेझ पाहायला मिळत आहे.

हे वर्ष बॉलिवूड इंडस्ट्रीसाठी चांगले ठरले नाही. कारण, यावर्षी बॉलिवूडचे चांगल्या चित्रपटांना अपयश मिळाले आहे. अशात ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट बॉलिवूडला यशाच्या शिखरावर पोहोचवताना दिसत आहे. या चित्रपटाने रविवारी (दि. 11 सप्टेंबर) तिसऱ्याच दिवशी जवळपास 42 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाने 100 कोटींचा आकडाही पार केला आहे. ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट आणखी कलेक्शन करण्याची शक्यता आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे, त्यामुळे ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणार असल्याची शक्यता आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट डिज्नी प्लस हॉटस्टार खरेदी करणार असल्याची शक्यता आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Brahmāstra (@brahmastrafilm)

याबद्दल आणखी काही वक्तव्य समोर आले नाही. मात्र, असेही म्हटले जात आहे की, डिज्नी प्लस हॉटस्टारवर पहिल्या दिवसापासूनच ‘पार्टनर’ बनला असल्याने चित्रपटाचे ओटीटी हक्क त्यांनाच विकले आहे. अशाही चर्चा आहेत की, धर्मा प्रॉडक्शन चित्रपटाचा करार ऍमेझॉनसोबतही आहे, त्यामुळे ओटीटी हक्क त्यांनाही मिळण्याची शक्यता आहे. ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट ओटीटीवर ऑक्टोबर अखेरपर्यंत येणार आहे. मात्र, हा सिनेमा कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होईल, हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘ब्रह्मास्त्र’ सिनेमा हिट करायचा म्हणून सांगितले जातायेत चुकीचे आकडे? बजेटइतकी कमाई करणेही कठीण
महिमाने सगळ्यांसमोर आणलेली बॉलिवूडची काळी बाजू; म्हणालेली, ‘व्हर्जिन अभिनेत्री नसेल, तर…’
‘अगं अगं आई…’, म्हणत प्रेक्षकांना पोट धरून हसवणारा ओंकार दिसणार मुख्य भूमिकेत, पण नायिका कोण?

हे देखील वाचा