Saturday, June 29, 2024

पांढऱ्या वाघाच्या बछड्यासोबत उर्वशीने केले ‘असे’ काही, पाहून तुम्हीही म्हणाल ‘जिगरबाज’

अभिनेत्री उर्वशी रौतेला सध्या चांगलीच चर्चेत आहे. ती आपल्या अभिनयाव्यतिरिक्त आपल्या सौंदर्यासाठी ओळखली जाते. आपल्या नवनवीन म्युझिक व्हिडिओंच्या माध्यमातून ती सध्या अक्षरश: धमाल करत आहे. सोशल मीडियावर आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करत ती नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात राहण्याची एकही संधी सोडत नाही. तिच्या सर्व पोस्ट चाहत्यांच्या पसंतीस पडत असतात. परंतु आता तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत असून, या व्हिडिओलाही चाहत्यांनी भरभरून प्रेम दिले आहे. तसेच तिच्या सौंदर्याची प्रशंसादेखील केली जात आहे.

व्हिडिओ होतोय व्हायरल
उर्वशीचा हा व्हिडिओ कोणताही डान्स व्हिडिओ नाहीये. या व्हिडिओत ती पांढऱ्या वाघाच्या बछड्यासोबत खेळताना दिसत आहे. त्याचबरोबर ती त्याचा लाडही करत आहे. हा व्हिडिओ उर्वशीच्या ‘वर्साचे बेबी’ या पहिल्या आंतरराष्ट्रीय गाण्याच्या शूटिंग सेटवरचा आहे. व्हिडिओत पांढऱ्या वाघाचा बछडा खुर्चीवर बसलेला दिसत आहे आणि उर्वशी त्याच्या अंगावर आपला हात फिरवत आहे. हे पाहून दिसते की, उर्वशी ही एक प्राणीप्रेमी देखील आहे.

उर्वशी आपले दोन्ही हात वाघाच्या बछड्याच्या गळ्याजवळ घेऊन जाते. त्यावेळी काही लोकांना वाटते की, तिला वाघाच्या बछड्याला उचलायचे आहे, परंतु नंतर ती आपला हात मागे घेते. उर्वशी आणि पांढरा वाघ दोघेही या व्हिडिओत खूपच गोड दिसत आहेत.

उर्वशी आहे प्राणीप्रेमी
उर्वशीचा हा अंदाज चाहत्यांनी यापूर्वी कधीही पाहिला नसेल. तिने या व्हिडिओत खूप मेकअप आणि लाल रंगाचा ड्रेस घातला आहे. त्यात सोनेरी रंगाचाही समावेश आहे. सोबतच तिने आपल्या केसात मोठी पोनी बनवली आहे. या व्हिडिओमध्ये उर्वशीसोबत तिचा सहकलाकार इजिप्शियन गायक मोहम्मद रमदानही दिसत आहे.

उर्वशीच्या गाण्याची धमाल
खरं तर उर्वशीचे ‘वर्साचे बेबी’ हे पहिले आंतरराष्ट्रीय गाणे रिलीझ झाले आहे. अभिनेत्री तिचे न पाहिलेले फोटो आणि व्हिडिओ सध्या शेअर करत आहे. उर्वशीचे हे गाणे सध्या धमाल करत आहे. यापूर्वी तिचे गुरू रंधावासोबतचे गाणेही हिट झाले होते. ती आता आपल्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहे. दुसरीकडे ती लॉकडाऊनमध्ये लोकांची मदतही करताना दिसत आहे. तसेच त्यांनी जेवणाचे पॅकेट्सही वाटत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘पप्पा मला तुमची खूप आठवण येतेय’, म्हणत वडिलांच्या आठवणीत हिना खानने केला भावुक व्हिडिओ शेअर

-फक्त शर्ट घालून अभिनेत्री दीपिका सिंगने केले सिझलिंग फोटोशूट, पाहून तुमचंही हरपेल भान

-बॉलिवूडमधील ‘काटा लगा गर्ल’ शेफाली जरीवालाने केले बिकिनीमधील फोटो शेअर, चाहत्यांनी केला कमेंट्सचा वर्षाव

हे देखील वाचा