Wednesday, July 3, 2024

जरा इकडे पाहा! उर्वशीच्या भांगेत सिंदूर अन् गळ्यात मंगळसूत्र; युजर म्हणाले,’मानसिक आरोग्य…’

बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला हिचे भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंत वरील प्रेम कुणापासून लपलेले नाही. ती तिच्या भावना अप्रत्यक्षपणे सोशल मीडियावर व्यक्त करत असते. अशातच उर्वशी रौतेलाने तिच्या इंस्टाग्रामवर स्वतःचा आणखी एक नवीन फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये उर्वशी लाल रंगाच्या साडीत सुहागनप्रमाणे पोज देताना दिसत आहे. भांगेत सिंदूर, गळ्यात मंगळसूत्र आणि हातात सोन्याच्या बांगड्या घालून ती कॅमेरासमोर पोज देताना दिसत आहे. हा फोटो शेअर करताना उर्वशी रौतेलाने असे काही लिहिले आहे, ज्यामुळे ती ट्रोलच्या निशाण्यावर आली आहे.

उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) हिने कॅप्शनमध्ये लिहिले की, “प्रेमात एका प्रेमीकाला, सिंदूरहून अधिक प्रिय काही नसतं… सर्व रीति रिवाज अनुसार पाहिजे, आयुष्यभराचा साथी..” उर्वशीने हे कॅप्शन पाहून सोशल मीडिया यूजर्स तिला एक्स बॉयफ्रेंड क्रिकेटर ऋषभ पंत (Rishabh Pant)सोबत जोडून पुन्हा ट्रोल करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Urvashi Rautela (@urvashirautela)

उर्वशी सध्या ऑस्ट्रेलियात आहे, जिथून ती सतत तिचे फोटो शेअर करत असते. फोटोंमध्ये ती खूप क्यूट दिसत असली, तरी सोशल मीडियावर सतत ट्रोल होत आहे. पण उर्वशी ऑस्ट्रेलियातील फोटो शेअर केल्‍यामुळे नाही, तर तिचा एक्स बॉयफ्रेंड क्रिकेटर ऋषभ पंतमुळे ट्रोल होत आहे. आजकाल ऋषभ पंत 16 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या T20 विश्वचषक 2022 साठी भारतीय क्रिकेट संघासोबत आला आहे. अशातच उर्वशी रौतेला ऑस्ट्रेलियात असल्याने लोक थोडे नाराज देखील आहेत. दोघांच्या अफेअरच्या चर्चांना पुन्हा एकदा जोर आला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Urvashi Rautela (@urvashirautela)

उर्वशीच्या पोस्टवर एका यूजरने कमेंट करत लिहिले की, “ती ऋषभच्या प्रेमात वेडी झाली आहे असे दिसते.”, तर दुसर्‍याने कमेंट करत लिहिले की,”काय ऋषभ भावा तू पण करून घे लग्न वहिनी चांगली आहे, का तू इतका त्रास देतोय.’ एका युर्जने, तर चक्क लिहिले, “मानसिक आरोग्य ठीक आहे ना.” त्याचवेळी एका युजरने लिहिले की, ”त्यांचा वेगळाच विश्वचषक सुरू आहे.”

माध्यमांतील वृत्तानुसार, उर्वशी आणि ऋषभ पंत यांनी 2018 मध्ये एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती, परंतु लवकरच त्यांचे नाते तुटले. 2019 मध्ये, ऋषभ पंतने त्याची गर्लफ्रेंड ईशा नेगीसोबतचा एक फोटो शेअर केला आणि त्याच्या नात्याबद्दल सांगितले. यानंतर उर्वशी आणि पंत यांच्या नात्यात दुरावा आला. अलीकडे उर्वशी आणि पंतमध्ये सोशल मीडियावर शाब्दिक वाद झाले होते.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बॉलिवूडच्या ‘या’अभिनेत्रींनी लग्ना अगोदरच दिली होती प्रेग्नेंसीची बातमी, जाणून घ्या एका क्लीकवर

मराठी माणुस! साेप्पा नव्हता शिवचा प्रवास करिअरच्या सुरुवातीला विकायचा दुध अन् न्युज पेपर

हे देखील वाचा