‘कष्टाला पर्याय नाही’, पण काम मिळण्यासाठी हवे बक्कळ फॉलोअर्स; असे आम्ही नाही तर सांगतेय ‘ही’ अभिनेत्री

Actress Vandana Sajnani Reveal She Got Replaced Due To Less Social Media Followers Raises Plight of Struggling Actors


‘कष्टाला पर्याय नाही’, असे अनेकदा म्हटले जाते. हे अगदी प्रत्येक ठिकाणी लागू होते. मग ते बॉलिवूड असो किंवा इतर क्षेत्र. बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी खूप मेहनत घेऊनही त्यांना चित्रपटासाठी नकार मिळाला आहे. हा नकार त्यांना कमी टॅलेंटमुळे, तर कधी नेपोटिझममुळे मिळाला आहे. अशातच आता एका अभिनेत्रीने सोशल मीडियावर बॉलिवूड इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा केला आहे. तिने बॉलिवूडमध्ये काम न मिळण्याचे कारण सांगितले आहे, जे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. तिचा हा व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होत आहे.

ही अभिनेत्री इतर कोणी नसून ‘वंदना सजनानी’ आहे. वंदनाने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर करत म्हटले की, “दोन वर्षांच्या ब्रेकनंतर मी विचार केला की, मला चित्रपटामध्ये पुनरागमन केले पाहिजे. त्यासाठी मी कास्टिंग एजंटसोबत चर्चा सुरू केली. यानंतर मला माझ्या सोशल मीडिया अकाउंटबद्दल विचारणा करण्यात आली. माझ्याकडून ऑडिशन्सही करवून घेतले, परंतु मला आपल्या परफॉर्मन्समुळे नाही, तर माझे सोशल मीडियावर कमी फॉलोअर्स असल्यामुळे बाहेर काढण्यात आले.”

“आजकाल इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोवर्स असणाऱ्यांनाच चित्रपटांमध्ये घेतले जाते. माझ्यासाठी हे हैराण करणारे कारण होते. कारण मी यापूर्वी असे काहीच ऐकले नव्हते,” असेही ती पुढे बोलताना म्हणाली.

इंस्टाग्राम फॉलोअर्सबद्दल बोलताना ती म्हणाली की, “जर तुम्हाला चांगले काम करता येत असेल, तर तुमची निवड ही इंस्टाग्राम फॉलोअर्समुळे होईल. ही गोष्ट चुकीची आहे.”

सोशल मीडियावर वंदनाचा हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. अभिनेत्रीचे अनेक चाहते आणि सोशल मीडिया युजर्स तिच्या व्हिडिओवर आपली प्रतिक्रिया देत आहेत.

वंदना ही बॉलिवूड अभिनेता राजेश खट्टर याची पत्नी आहे. दोघांनीही सन २००८ मध्ये लग्न केले होते. विशेष म्हणजे राजेश खट्टर यांनी यापूर्वी सन १९९० मध्ये शाहिद कपूरची आई नीलिमा अझीमशी लग्न केले होते. पंकज कपूरशी घटस्फोट झाल्यानंतर शाहिदच्या आईने राजेश यांच्याशी लग्न केले होते. राजेश आणि नीलिमा यांना एक मुलगा आहे. त्याचं नाव इशान खट्टर असे आहे. इशानच्या जन्मानंतर सन २००१ मध्ये त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता.

तिच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झालं, तर तिने बॉलिवूडच्या ‘दिल धडकने दो’, ‘लक लक की बात’, ‘कार्पोरेट’ आणि ‘रिश्ते’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. असे असले, तरीही मुख्य अभिनेत्री म्हणून ती खूप कमी चित्रपटांमध्ये झळकली आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-हॉटनेस ओव्हरलोड! तेलुगु अभिनेत्रीचे स्विमिंग पूलवरील बिकिनीतील फोटोशूट होतंय व्हायरल, पाहा बोल्ड फोटो

-नादच खुळा! ‘तेरी मिट्टी’ गाण्याला आवाज देणाऱ्या बी प्राकचं नवीन गाणं रिलीझ, होतंय जोरदार व्हायरल

-बजरंगी भाईजाच्या मुन्नीने पुन्हा वेधले चाहत्यांचे लक्ष, डान्स व्हिडिओ होतोय व्हायरल!!


Leave A Reply

Your email address will not be published.