सुजॉय घोषचा मिस्ट्री थ्रिलर चित्रपट ‘कहानी’ ९ मार्च २०१२ रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात विद्या बालन, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि परमब्रत चॅटर्जी, अद्वैत काला यांनी उत्तम काम केले आणि चित्रपट हिट झाला. विद्या बालनने या चित्रपटात एका गर्भवती महिलेची भूमिका साकारली आहे, जी दुर्गा पूजा उत्सवादरम्यान कोलकात्यात तिच्या हरवलेल्या पतीचा शोध घेते आणि तिला परब्रता चॅटर्जी आणि नवाजुद्दीन सिद्दीकीने मदत केली. चित्रपटाला १० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने नवाजुद्दीन सिद्दीकीने शूटिंगच्या दिवसातील एक रंजक किस्सा सांगितला.
नवाजुद्दीन सिद्दीकी पडला होता अडचणीत
‘कहानी’साठी १० वर्षांपूर्वी जेव्हा सुजॉय घोषने नवाजुद्दीन सिद्दीकीशी (Nawazuddin Siddiqui) संपर्क साधला होता. तेव्हा अभिनेत्याची कोंडी झाली होती. पण सुजॉयने त्याला चित्रपटात काम करण्यास तयार केले. या चित्रपटाला १० वर्षे पूर्ण झाल्यामुळे नवाजला आनंद आहे की, त्याने या चित्रपटात काम केले आहे. अभिनेत्याने सांगितले की, “आज मला अभिमान वाटतो की, मी या चित्रपटात काम केले आणि या चित्रपटानंतर मला मागे वळून पाहावे लागले नाही. लोकांना माझे काम आवडले याचा मला आनंद आहे.”
नवाजुद्दीन एकाच वेळी तीन चित्रपटांचे करत होता शूटिंग
जुन्या दिवसांची आठवण करून देताना नवाजुद्दीन सिद्दीकीने हिंदुस्तान माध्यमांशी बोलताना सांगितले की, “मी त्यावेळी ‘गँग्स ऑफ वासेपूर’, ‘तलाश’ आणि ‘कहानी’ एकत्र शूट करत होतो. तिन्ही चित्रपट एकाच वेळी प्रदर्शित झाले. या तीन चित्रपटांनी माझ्या कारकिर्दीला कलाटणी दिली. मी ‘कहानी’ करायला तयार नव्हतो. ‘गँग्स ऑफ वासेपूर’ ची वर्कशॉप चालू होती. सुजॉयने मला कॉल केला आणि आम्ही वर्सोव्यातील एका रेस्टॉरंटमध्ये भेटलो. तिथे त्याने मला एक डॉक्युमेंटरी दाखवली. ती पाहिल्यानंतर मला तो प्रोजेक्ट खूपच मनोरंजक वाटला. मग मी अनुराग कश्यपकडे गेलो आणि मी विचारले.” चित्रपटाच्या शुटिंगच्या दरम्यान त्याला काही दिवसांची रजा मिळाली आणि त्याने आनंदाने होकार दिला. अनुरागची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तो कधीही एखाद्या अभिनेत्याला त्याच्या चित्रपटाच्या शूटिंगच्या मध्यभागी दुसरा चित्रपट करण्यास मनाई करत नाही.
‘कहानी’ने बदलले माझे करिअर
नवाजुद्दीन सिद्दीकीने सांगितले की, ”सुरुवातीला असा काही खास अंदाज नव्हता की, हा चित्रपट इतका हिट होईल. सत्य हे आहे की, चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा तीन दिवस काहीही झाले नाही आणि तो हिट होईल हे माहीत नव्हते. मात्र रविवारनंतर निर्माते आणि सुजॉय यांना अभिप्राय उत्कृष्ट असल्याचे फोन येऊ लागले. त्यानंतर हा चित्रपट येताच अप्रतिम झाला.”
केवळ ८ कोटींच्या या चित्रपटाने केली होती शानदार कमाई
नवाजुद्दीन सिद्दीकी सध्या ‘ग्रेटर नोएडा’मध्ये एका चित्रपटाचे शूटिंग करत आहे. अभिनेत्याने सांगितले की, “आजही परिस्थिती बदललेली नाही. मी एकाच वेळी वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारत आहे. मी सुरुवातीपासून त्याच मार्गावर चालत आहे, आणि मजा आहे.” अवघ्या ८ कोटींमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. या चित्रपटाची कथा, चित्रीकरण, कलाकार या सगळ्याचं कौतुक झालं.
हेही वाचा –
- युजर्सनी सबा अलीला विचारले अमृता सिंग कुठे आहे? सैफ अली खानच्या बहिणीने दिले मजेशीर उत्तर
- राखी सावंतने सांगितला होळीचा किस्सा, जेव्हा तिने फुगे समजून कंडोम भरले होते पाणी तेव्हा…
- सुरभी चांदनाने खास अंदाजात केला महिला दिन साजरा, स्वतःलाच म्हणाली ‘मी…’