Wednesday, April 17, 2024

सुरभी चांदनाने खास अंदाजात केला महिला दिन साजरा, स्वतःलाच म्हणाली ‘मी…’

अभिनेत्री सुरभि चांदना (Surbhi Chandna) ही सोशल मीडीयावरती खुपच सक्रिय असते. तीने नुकतीच सोशल मीडीयावरुन महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामधे तिने तिचे फोटो शेअर केले आहे. फोटोमध्ये ती काळा रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे.हा फोटोला शेअर करत तिने खुप सुंदर कॅप्शनही दिले आहे. तिने लिहले आहे की, “मी एक स्त्री आहे, मी बिनधास्त आहे. मी सेक्सी आहे, मी देवी आहे, मी सर्जनशील आहे मी ते सर्वकाही आहे जे मला बनायचे आहे. “

तिने तारक मेहता का उल्टा चश्मा शो मधुन टेलिव्हिजन क्षेत्रात पदार्पण केले होते. ती टेलिव्हिजन क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेत्रीपैकी एक आहे. तिने ‘नागिन 5’ मध्येही काम केले आहे. २००९ मध्ये तिने टेलिव्हिजन क्षेत्रात पदार्पण केले होते. २०१३ मध्ये ती ‘एक ननंद की खुशियो की चाबी मेरी भाभी ‘यामध्ये दिसली होती.  २०१४ मध्ये तिला ‘कबुल है’ या मालिकेने ओळख निर्माण करुन दिली आहे.

‘कबुल है’ मध्ये ती मुख्य पात्रात दिसली होती. या शोला खूप लोकप्रियता मिळाली होती त्यामुळे तिच्या लोकप्रियतेत वाढ झाली. २००१६ मध्ये ती स्टार प्लस वरील सीरियल ‘इश्कबाज’ मधुनही तिच्या अभिनयाने प्रक्षकावरती भुरळ घातली. २०१७ मध्ये ती नवीन टेलिव्हिजन शो ‘दिल बोले ओबेरॉय’ यामध्येही ती मुख्य पात्रात दिसली होती. या शोमध्ये ती अनिका ओबेरॉय हे पात्र साकारले होते. ‘आहट’ यासारख्या मालिकेत तिने काम केले आहे.

हेही वाचा

 

 

हे देखील वाचा