Friday, February 3, 2023

विद्या बालन आणि शेफाली शाह यांच्या ‘जलसा’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, एका मोठ्या सत्याचा होणार खुलासा

विद्या बालन (Vidya Balan) आणि शेफाली शाह (Shefali Shah) यांच्या ‘जलसा’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीझ झाला आहे. विद्या या चित्रपटात एका पत्रकाराची भूमिका साकारत असून, शेफाली शाह एका आईच्या भूमिकेत आहे जी एक रहस्य लपवत आहे. ट्रेलरची सुरुवात एका मुलीने होते जिचा अपघात होतो. यानंतर या प्रकरणाची मीडियात चर्चा रंगते. या प्रकरणावरून खळबळ उडाली असून, अनेक गुपिते समोर आलेली पाहायला मिळतात. विद्या आणि शेफालीचा जबरदस्त परफॉर्मन्स ट्रेलरमध्येच पाहायला मिळाला. ट्रेलरची टॅगलाईन आहे, ‘एक सच जो सबका सीक्रेट बन जाए.’

कोव्हिडमुळे, निर्मात्यांनी ‘जलसा’ चित्रपट ऍमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. असे म्हटले जात आहे की, चित्रपटाची मुख्य अभिनेत्री विद्या बालन या निर्णयावर खूश नव्हती. परंतु तिच्या शेवटच्या दोन ‘शकुंतला देवी’ आणि ‘शेरनी’ या चित्रपटांना ओटीटीवर यश मिळाल्यानंतर, तिनेही होकार दिला. (vidya balan and shefali shah movie jalsa trailer is out watch video)

सुरेश त्रिवेणी दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार आणि कृष्ण कुमार करत आहेत. या चित्रपटात विद्यासोबत शेफाली शाह, मानव कौल, इक्बाल खव, श्रीकांत मोहन यादव, शफीन पटेल यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

विद्या बालनने या चित्रपटाविषयी सांगितले की, “आम्ही काहीही करत असलो तरी त्यामागे नेहमीच एक सामाजिक मुद्दा असतो, पण आम्ही एक गोष्ट सांगत असतो. आम्हाला आमच्या कथेने लोकांच्या जीवनाला स्पर्श करायचा आहे. या चित्रपटात प्रत्येकासाठी काहीतरी आहे, फक्त माया किंवा रुक्सानासारख्या महिलांसाठी नाही. अर्थात, कथा या दोन पात्रांद्वारे सांगितली गेली आहे, परंतु ही एक सार्वत्रिक कथा आहे जी प्रत्येकजण, अगदी पुरुषांशी देखील जोडू शकेल.”

विद्या बालनने शेफाली शाहसोबत काम करण्याबद्दल सांगितले, “मी अनेक प्रतिभावान कलाकारांसोबत काम केले आहे, शेफाली शाह त्यापैकी एक आहे. मी त्यांच्यासोबत पहिल्यांदा एका टीव्ही शोमध्ये काम केले. मला माहित नाही की, त्यांना आठवते की नाही. पण त्या जे काही करतात, ते मला प्रेरणा देते. त्यांची फिल्मोग्राफीही जबरदस्त आहे.”

चित्रपटाच्या ट्रेलरबद्दल बोलायचे झाले, तर त्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. चाहते कलाकारांच्या अभिनयाचेही भरभरून कौतुक करत आहेत. अशा परिस्थितीत चित्रपटाला कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा