बाप रे!! तीन-चार वेळा लग्न करणाऱ्या तारका, कुणी पटलं नाही म्हणून घेतला घटस्फोट तर कुणी…


असं म्हणतात की लग्न म्हणजे सात जन्मांच बंधन, जन्मोजन्मीची ओळख. परंतु काही व्यक्ती या नात्याला सात जन्म काय पण आयुष्यभरही नीट निभावू शकतं नाही. काही व्यक्तींचे तर एक नाही तर दोन-तीन घटस्फोट झालेले असतात. माणसाचं जेव्हा दुधाने तोंड भाजत, तेव्हा तो ताक देखील फुंकून पितो, असं म्हणतात. पण काही व्यक्तींना या गोष्टींची काहीच पर्वा नसते. या बाबतीत काही माणसांचं नशीबच खूप खराब असतं, असंच म्हणावं लागले. बाकी आपले बॉलीवूडकरही यात मागे नाहीत मंडळी.  या लेखात आपण अगदी अश्याच काही कलाकार मंडळींबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी तीन-तीन लग्न केलीत.

बिंदिया गोस्वामी
बिंदिया गोस्वामी ही तिच्या जमाण्यातील एक नवाजलेली अभिनेत्री होती. बिंदियाने तिच्या आयुष्यात 2 वेळा लग्न केले होते. पाहिले लग्न तिने विनोद मेहेरा यांच्यासोबत केले होते, परंतु लग्नाच्या चार वर्षानंतर तिने घटस्फोट घेतला. त्यानंतर तिने ज्योती प्रकाश दत्त यांच्या सोबत दुसरे लग्न केले. ज्योती प्रकाश आणि बिंदिया यांना निधी आणि सिद्धी या दोन मुली आहेत.

नीलम कोठारी
नीलम कोठारी ही देखील बॉलिवूडमधील एक चमकता सितारा होती. तिने तिच्या कारकिर्दीत अनेक चित्रपटांमध्ये काम केले. नीलमने ऋषी सिटी याच्यासोबत पहिले लग्न केले होते. परंतु त्यांचं हे नात जास्त दिवस नाही टिकू शकले. त्यानंतर नीलमने अभिनेता समीर सोनी याच्यासोबत दुसरे लग्न केले. समीरचे देखील हे दुसरे लग्न होते.

योगिता बाली
अभिनेत्री योगिता बाली हिने देखील दोन लग्न केली होती. 1976 मध्ये किशोर कुमार सोबत तिने पाहिले लग्न केले होते. परंतु लग्नाच्या दोन वर्षानंतर त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर तिने बॉलिवूडमधील डिस्को डान्सर मिथुन चक्रवर्ती याच्यासोबत 1979 मध्ये दुसऱ्यांदा लग्न केले.

नीलिमा अजीम
आधीच्या जमण्यातील लोकप्रिय अभिनेत्री आणि अभिनेता शहीद कपूरची आई नीलिमा अजीम हिने तिच्या आयुष्यात तीन वेळा लग्न केले आहे. 1979 मध्ये तिने पंकज कपूर याच्यासोबत पाहिले लग्न केले होते. त्या दोघांचा 1984 मध्ये घटस्फोट झाला. त्यानंतर नीलिमाने 1990 मध्ये राजेश खट्टर सोबत लग्न केले. परंतु काही गैरसमजामुळे 2001 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. परत नीलिमाने 2004 मध्ये राजा अली खान सोबत लग्न केले. परंतु ते देखील एकमेकांना शेवटपर्यंत साथ नाही देऊ शकले आणि 2009 मध्ये त्यांचा देखील घटस्फोट झाला.

जेबा
जेबा जी मुळात पाकिस्तानी अभिनेत्री आहे. 1991 मध्ये हीना या चित्रपटातून तिने बॉलिवूड मध्ये पदार्पण केले. या चित्रपटात तिच्या सोबत ऋषी कपूर हे मुख्य भूमिकेत होते. जेबाबद्दल ही गोष्ट ऐकून तुम्ही नक्कीच हैराण व्हाल की, जेबा चार वेळा विवाह बंधनात बांधली गेली होती. जेबाने पाहिले लग्न आदनान सामी याच्यासोबत केले होते. दुसरे लग्न जावेद जाफरी, तिसरे लग्न सलमान विलयानी ते चौथे लग्न सोहेल खान लेगहारी याच्या सोबत केले होते.


Leave A Reply

Your email address will not be published.