Monday, July 1, 2024

चित्रपटात साधी- सोज्वळ आई; मात्र खऱ्या आयुष्यात तितकीच ‘ग्लॅमरस’; एकदा पाहाच कोण आहेत ‘या’ अभिनेत्री

कलाविश्वातील अभिनेत्रींची सुंदरता एका अप्सराप्रमाणे असते. या अभिनेत्रींना परी, सुंदरा, मनमोहिनी, हॉट अशा अनेक उपमांनी संबोधले जाते. अशात या अभिनेत्री आपल्या सुंदरतेच्या जोरावर अनेक चित्रपट मिळवतात. त्यांच्या दिलखेचक अदा आणि झकास नखरे पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता कायमच शिगेला पोहचलेली असते. या अभिनेत्री ऐन तारुण्यात देखील अनेक ज्येष्ठ भूमिका उत्तमपणे पार पाडतात. एखाद्या मालिकेमध्ये त्यांनी साकारलेली वृद्ध महिलेची भूमिका त्या एवढ्या प्रखरतेने पार पाडतात की, त्या एवढ्या तरुण आहेत यावर कुणाला विश्वासच बसत नाही. बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्रींची उदाहरणे देता येतील. अशाच काही पडद्यावर ज्येष्ठ आणि खऱ्या आयुष्यात तरुण असलेल्या अभिनेत्रींविषयी जाणून घेऊयात.

मेहर विज
चित्रपट ‘बजरंगी भाईजान’मध्ये या अभिनेत्रीने लहान मुन्नीच्या आईची भूमिका साकारली होती. यामध्ये तिचे वय जवळपास ३५ पेक्षाही जास्त वाटत होते. परंतु आपल्या खऱ्या आयुष्यात मेहर अतिशय सुंदर आणि हॉट दसते. या चित्रपटामध्ये ती एका मुलीची आई आहे. परंतु तिचे सोशल मीडियावरील फोटो पाहिले, तर तुम्ही चकित व्हाल. (Actress who play the role of aged mother on screen are very beautiful it is so difficult to guess their age)

अमृता सुभाष
चित्रपट ‘गली बॉय’मध्ये या अभिनेत्रीने ५० वर्षाच्या महिलेची भूमिका निभावली होती. यामध्ये मुख्य भूमिकेत रणवीर कपूर आणि आलिया भट्ट होते. चित्रपटात अमृताने रणवीरच्या आईची भूमिका निभावली होती. अभिनेत्री एक उत्तम कवियत्री देखील आहे. तिने या चित्रपटात साकारलेली भूमिका प्रेक्षकांना फार आवडली होती. अमृता तिच्या खऱ्या आयुष्यात अतिशय सोज्वळ, सुंदर आणि तरुण दिसते.

अर्चना जोइस
दाक्षिणात्य चित्रपटांतील अर्चना या सुंदर अभिनेत्रीने देखील एका आईची भूमिका साकारली आहे. साल २०१८ मध्ये ‘केजीएफ’ या चित्रपटात ती झळकली होती. या चित्रपटात तिने अभिनेता यशच्या आईची भूमिका पार पाडली. तिने या पात्रामध्ये खूप जीव ओतून काम केले. तिच्या या भूमिकेला रसिक प्रेक्षकांनी चांगलंच डोक्यावर घेतलं होत. अवघ्या २७ वर्षीय या सुंदर अभिनेत्रीने आईची भूमिका दमदार पद्धतीने साकारली होती.

नादिया
अनेक चित्रपटांमध्ये आईची भूमिका साकारलेली ही अभिनेत्री खऱ्या आयुष्यात अतिशय सुंदर आणि तरुण दिसते. चित्रपट ‘मिर्ची बाजार’ यामध्ये नादियाने साकारलेल्या भूमिकेने ती घराघरात पोहचली. या चित्रपटामध्ये तिने दाक्षिणात्य अभिनेता प्रभासच्या आईची भूमिका निभावली होती. अभिनेत्री तिच्या खऱ्या आयुष्यात तितकीच ग्लॅमरस आहे.

 

राम्या कृष्णन
‘बाहुबली’ चित्रपटातील शिवगामी देवीची भूमिका कोणीच विसरू शकत नाही. राम्याने ती भूमिका साकारली होती. यामधील तिचा उत्साह आणि जोश पाहून भल्या भल्यांना भुरळ पडली. राम्याने या चित्रपटात आईची साकारलेली भूमिका ही खूप प्रभावशाली होती.

चित्रपटापेक्षाही कितीतरी पटीने जास्त सुंदर ती खऱ्या आयुष्यात दिसते. तसेच सोशल मीडियावरील तिच्या हॉट फोटोंना चाहते खूप पसंत करतात.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सिद्धार्थचा अंतिम प्रवास सुरू, लवकरच होणार पंचतत्वात विलीन

-‘मृत्यू हे आयुष्यातील सर्वात मोठे…’, मृत्यूनंतर सिद्धार्थ शुक्लाचे जुने ट्वीट व्हायरल

-सिद्धार्थ शुक्लाने शहनाझ गिलच्या कुशीत घेतला अखेरचा श्वास? म्हणाली, ‘मी आता कसं जगू शकेन’

हे देखील वाचा