Monday, July 8, 2024

‘या’ अनिष्ठ प्रथेला नुसरत भरुचा देणार छेद, याआधीही अनेक अभिनेत्रींनी केला आहे धाडसी प्रयत्न

अभिनेत्री नुसरत भरुचा (nushrat bharucha)  सध्या तिच्या आगामी ‘जनहित में जारी’ या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आली आहे. या चित्रपटाची कथा एका सामाजिक आणि वेगळया कथेवर आधारित आहे. सध्या नुसरत तिच्या या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसून येत आहे. या चित्रपटामध्ये ती कंडोम विकणाऱ्या महिलेची भूमिका साकारताना दिसत आहे. आजपर्यंत ज्या विषयांवर महिला मनमोकळेपणाने बोलत नाहीत. चर्चा करत नाहीत अशा महत्वाच्या विषयावर नुसरतने भूमिका केली आहे. त्यामुळे साहजिकच तिच्या या भूमिकेला आणि चित्रपटाच्या कथेला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. परंतु अशा संवेदनशील आणि सामाजिक विषयांवर भाष्य करणारे चित्रपट याआधीही पाहायला मिळाले आहेत. कोणते आहेत ते चित्रपट चला जाणून घेऊ.

नीना गुप्ता (Neena Gupta)
चित्रपट: बधाई दो (2018)
अभिनेत्री नीना गुप्ताने ‘बधाई हो’ चित्रपटातील तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी बरीच प्रशंसा मिळवली होती. या चित्रपटाच्या माध्यमातून तिने वृद्ध महिलेला आई बनण्याचा अधिकार नाही असा समज किंवा संदेश समाजात पसरवला जातो त्याविरोधात कथा रंगवली होती. ठराविक वयानंतर आई होणं ही समाजात खिल्ली उडवणारी बाब मानली जाते. मात्र नीनाने या चित्रपटातून हा समज तोडण्याचा प्रयत्न केला. ही व्यक्तिरेखा तिने उत्तम प्रकारे साकारली असून या चित्रपटाला चांगले यशही मिळाले आहे.

सोनम कपूर (Sonam Kapoor) 
चित्रपट: एक लडकी को देखा तो ऐसा लगा (2019)
सोनम कपूरनेही ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’मध्ये सोशल असाच एक प्रयत्न केला होता. यात एका समलिंगी प्रेमकथेचे चित्रण करण्यात आले असून तिने ही व्यक्तिरेखा खूप छान साकारली होती. या चित्रपटातील सोनम कपूरची सहजसुंदर शैली चाहत्यांना आवडली होती.

श्वेता त्रिपाठी (Shweta Tripathi)
चित्रपट: गॉन केश (२०१९)
‘गॉन केश’ या चित्रपटात अभिनेत्री श्वेता त्रिपाठीने टक्कल पडलेल्या मुलीची भूमिका साकारली होती. तिने ही भूमिका अतिशय उत्तमपणे साकारली होती. श्वेता त्रिपाठीने या चित्रपटात अलोपेशिया नावाच्या आजाराने ग्रस्त असलेल्या मुलीची भूमिका साकारली. या आजारात तिचे केस गळतात आण त्यामुळे तिला टक्कल पडतो.

भूमी पेडणेकर
चित्रपट: बधाई दो (२०२२)
अभिनेत्री भूमी पेडणेकरने या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘बधाई दो’ या चित्रपटात समलैंगिक व्यक्तिरेखा साकारली होती. तिचे काम प्रेक्षकांना खूप आवडले होते. समलैंगिक मुलगीही सामान्य जीवन जगू शकते, हा समज तिने मोडून काढला. हा चित्रपट लव्हेंडर मॅरेजवर आधारित आहे. हा विवाह दोन समलैंगिक व्यक्तींमध्ये होतो. लोक वेगवेगळ्या कारणांसाठी हा करार विवाह करतात. काही जण विवाहितेचा दर्जा मिळविण्यासाठी आणि स्वतःच्या इच्छेने जीवन जगण्यासाठी हा विवाह निवडतात. या चित्रपटात भूमी पेडणेकरसोबत राजकुमार रावही दिसला होता. या चित्रपटातील भूमीच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते.

हे देखील वाचा