Thursday, March 28, 2024

सोनाक्षी सिन्हा पडली मुस्लीम युवकाच्या प्रेमात, सर्वांसमोर बोलली ‘लब्यू’, बघा कोण आहे तो?

बॉलिवूडमधील अभिनेते आणि अभिनेत्रींच्या प्रेमकथा त्यांनी कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी माध्यमांना त्याचा सुगावा लागतोच. आजपर्यंत मी सिंगल आहे म्हणत स्वतःच्या प्रेमप्रकरणाचा खुलासा न करणाऱ्या अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाबद्दलही असाच प्रकार घडला आहे. अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha)  आणि झहीर इकबालच्या (zaheer iqbal)  प्रेमप्रकरणाची बऱ्याच दिवसांपासून सुरू चर्चा सुरू होती. मात्र दोघांनीही याबद्दल अद्याप दुजोरा दिलेला नव्हता. आता त्यांच्या प्रेमप्रकरणाबद्दलची महत्वाची माहिती समोर आली असून दोघांनीही आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. 

सोनाक्षी सिन्हा ही हिंदी चित्रपट जगतातील एक आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या दमदार अभिनयाने आणि सौंदर्याने तिने सिने जगतात वेगळी ओळख निर्माण केली आहे. इतर बॉलिवूड अभिनेत्रींप्रमाणे सोनाक्षीचेही नाव अनेक अभिनेत्यांपेशी जोडले गेले होते. परंतु सर्वात जास्त चर्चा सोनाक्षी आणि झहीर इकबाल यांच्या नावाची झाली होती. दोघांमध्ये प्रेम बहरत असल्याच्या बातम्या अनेकदा समोर आल्या होत्या मात्र त्याबाबत दोघांनीही अधिकृतपणे बोलणे टाळत या बातम्या अफवा असल्याचे म्हणले होते.

परंतु झहीर इकबालने केलेल्या एका पोस्टमुळे त्यांच्या प्रेमाबद्दलच्या बातम्या खऱ्या असल्याचा उलघडा झाला आहे. झहीरने केलेल्या एका पोस्टमुळे या लवस्टोरीचा खुलासा झाला आहे. नुकताच झहीरने सोनाली सोबत घालवलेल्या काही सुखद क्षणांचा एक व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन शेअर केला आहे. या व्हिडिओसोबत त्याने “वाढदिवसाच्या शुभेच्छा, मला न मारण्यासाठी धन्यवाद, आय लव यू, येणाऱ्या काळातही आपण असेच खात, हसत खेळत दिवस घालवू,”  असा कॅप्शन दिला आहे.

झहीरच्या या सुंदर व्हिडिओवर सोनाक्षीनेही प्रतिक्रिया देताना “थॅंक यू,लव यु मी तुला मारायला येत आहे,” असा गमतीशीर कॅप्शन दिला आहे. झहीरची ही पोस्ट आणि त्यावर अभिनेत्री सोनाक्षीची प्रतिक्रिया यामुळे त्यांच्या लवस्टोरीचा खुलासा झाला आहे. काही दिवसांपूर्वी दोघेही एका लग्नात सोबत फिरताना दिसले होते. तर अभिनेत्री सोनाक्षीने सोशल मीडियावर अंगठीचे फोटोही दाखवले होते यामुळेच त्यांच्या प्रेमप्रकरणाची जोरदार चर्चा रंगली होती.

हे देखील वाचा