Saturday, July 27, 2024

सैनिकांचा अपमान ते महाभारतातील द्रौपदीला लावला टॅटू, एकता कपूरचे ‘हे’ कार्यक्रम सापडले होते वादाच्या भोवऱ्यात

बॉलिवूडची लोकप्रिय निर्माती एकता कपूर (Ekta Kapoor)  ओटीटी आणि छोट्या पडद्यावरील क्विन म्हणून ओळखली जाते. अनेक लोकप्रिय मालिकांची निर्मिती एकता कपूरने केली आहे. छोट्या पडद्यावरील मालिकांप्रमाणेच एकताने ओटीटी प्लॅटफॉर्मवरही अनेक यशस्वी सिरीज काढत आपली छाप पाडली आहे. त्यामुळेच एकता कपूरला टेलिव्हिजन क्विन म्हणून ओळखले जाते. बॉलिवूड, ओटीटी आणि छोट्या पडद्यावरील मालिका अशा प्रत्येक क्षेत्रात एकताने धमाल केली आहे. अनेक तरुण कलाकारांचे नशीब घडवण्यात एकताचा महत्वाचा वाटा आहे. मात्र एकता आपल्या बोल्ड कंटेटमुळेही सर्वात जास्त चर्चेत येत असते. तिच्या अशा कार्यक्रमांमुळेच ती अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. बुधवारी (7 जून)ला निर्माती एकता कपूरचा वाढदिवस, पाहूया एकता कपूरच्या या वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या मालिका आणि ओटीटीवरील कार्यक्रमांची ही भलीमोठी यादी.

जोधा अकबर मालिका वाद –
झी टिव्हीवरील जोधा अकबर ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. मालिकेच्या कथेला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद पाहायला मिळाला होता. परंतु या कार्यक्रमामुळे एकता कपूर वादाच्या भोवऱ्यातही अडकली होती. अखिल भारतीय क्षत्रिय महासभेने या कार्यक्रमावर आक्षेप घेत जोधाच्या भूमिकेला चुकीच्या पद्धतीने दाखवल्याचा आरोप केला होता. यामुळे एकता कपूरला चांगलाच विरोध पत्करावा लागला होता.

XXX सिझन 2 – एकता कपूरची XXX सिझन 2 ही वेबसिरीजही चांगलीच वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. या वेबसिरीजमध्ये सिमेवरील जवानांच्या पत्नींची कथा चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आली होती. आपल्या पतीच्या अनुपस्थितीत ती दुसऱ्या पुरूषाशी संबंध ठेवते अशी दृश्ये यामध्ये दाखवण्यात आली होती. त्यामुळेच एकता कपूरवर चौफेर टिका झाली होती. शेवटी तिला कथेतून ही दृश्ये वगळावी लागली होती.

महाभारत – एकता कपूरने 2008मध्ये महाभारत या धार्मिक मालिकेची निर्मिती केली होती. या मालिकेत तिने द्रौपदीच्या हातावर टॅटू काढलेला दाखवला होता ज्यामुळे तिला टिकेला सामोरे जावे लागले होते. यावर जेष्ठ अभिनेते मुकेश खन्ना यांनी टिका करताना एकता कपूरने महाभारताची हत्या केल्याचा आरोप केला होता. यावर एकता कपूरने उत्तर देताना हे मॉडर्न काळातील महाभारत असल्याचे उत्तर दिले होते. यावर मुकेश खन्ना यांनी संस्कृती कधीच मॉडर्न होत नाही, ज्या दिवशी तसा प्रयत्न करशील तेव्हा तुच संपून जाशील अशा कडक शब्दात खडेबोल सुणावले होते.

पोस्टर चोरीचा आरोप – एकता कपूरच्या हीज स्टोरीज हा चित्रपटही चांगलाच वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. हीज स्टोरीज चित्रपटावर पोस्टर चोरीचा आरोप करण्यात आला होता. चित्रपट निर्माते सुधांशू सरिया यांनी त्यांच्या लव चित्रपटाचा पोस्टर चोरल्याचा आरोप एकता कपूरवर लावला होता. याबरोबरच एकता कपूरच्या जजमेंटल है क्या, द मैरिड वुमन आणि हीरो बोल रहा हूं या कार्यक्रमांवरही पोस्टर चोरीचा आरोप लावण्यात आला होता. (ekta kapoor birthday special know about her controvercial program)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
कुणीतरी येणार गं! अभिनेत्री स्वरा भास्करने दिली गुडन्यूज; पोस्ट शेअर करत म्हणाली…
‘बाईपण भारी देवा’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला; चित्रपटाच्या शीर्षक गीताचे लॉन्चिंग थेट महालक्ष्मीच्या मंदिरातून

हे देखील वाचा