Friday, March 14, 2025
Home बॉलीवूड धाडस असावं तर असे! बॉलिवूडमधील घराणेशाहीवर यामी गौतम स्पष्टच बाेलली

धाडस असावं तर असे! बॉलिवूडमधील घराणेशाहीवर यामी गौतम स्पष्टच बाेलली

अभिनेत्री यामी गौतम बऱ्याचकाळापासून बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. नुकतीच यामी अभिषेक बच्चन सोबत ‘दस्थ‘ या चित्रपटात दिसली होती. यामी अनेकदा साेशल मीडियावर सक्रिय असून चाहत्यांशी संवाद साधते अशातच यामीने तिच्या ट्विटर अकाउंटवरून चाहत्यांशी संवाद साधला आहे. यादरम्यान यामी गौतम बॉलीवूडमधील घराणेशाहीबद्दलही बोलली, तसेच तिने सद्यस्थितीबाबत आपले मत मांडले.

घराणेशाहीबद्दल बाेलली यामी
सोशल मीडियावर चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना यामी म्हणाली की, “आता परिस्थिती खूप बदलत आहे. भूतकाळात जे काही घडले ते विसरले पाहिजे आणि पुढे बघितले पाहिजे.”

यामी हिने ट्विटरवर चाहत्यांसह #AskYami सेशन केले. या सेशनदरम्यान लोकांनी यामीला अनेक प्रश्न विचारले. एका युजरने विचारले की, “बॉलीवूडमध्ये आजही नेपोटिझम आहे का? आणि तुम्हालाही नेपोटिझमचा सामना करावा लागला आहे का?” याला उत्तर देताना यामीने सांगितले की, “यापूर्वी जे काही झाले ते झाले. आता आपल्याला पुढे पाहण्याची गरज आहे.”

इंडस्ट्रीला मिळत आहे राेज नवनवीन प्रतीमा
यामी गाैतम म्हणाली, “इंडस्ट्रीमध्ये नवीन टॅलेंट शोधून ते अधिक चांगले बनवण्यावर आमचे लक्ष असायला हवे. उद्योगात बदल होत आहेत. बर्याच गोष्टी फार बदलत आहेत. आता इंडस्ट्रीत नवीन लोक येत आहेत. इंडस्ट्रीला रोज नवनवीन प्रतिभा मिळत आहे. त्यामुळे आमची इंडस्ट्री चांगली होत आहे.”

प्रेक्षकांचा कल साऊथच्य सिनेमांकडे वाढताेय
यामी गौतमने पुढे सांगितले की, “आपण चित्रपटांना 2 स्ट्रीममध्ये पाहू नये. हिंदी चित्रपटसृष्टीत काही वर्षांपासून अपेक्षेप्रमाणे कंटेंट दिला जात नाही. त्यामुळे लोकांमध्ये नाराजी आहे. त्याचबरोबर दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये चांगला कंटेंट पाहायला मिळत आहे. त्यामुळे साऊथच्या सिनेमांकडे प्रेक्षकांचा कल वाढला आहे. पण आपणही आपल्या प्रेक्षकांना डोळ्यासमोर ठेवून तत्सम चित्रपट बनवले पाहिजेत.”

यामी गौतम इंस्टाग्राम सक्रिय असुन कायम चाहत्यांच्या संपर्कात असेत. ती अनेकदा तिचे फाेटाे आणि व्हिडिओ चाहत्यांसाेबत शेअर करते. यामी सध्या आदित्य धरसोबत आनंदी वैवाहिक जीवन जगत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
अभिनेत्री स्मिता पाटील यांचा मुलगा असलेला प्रतीक ‘कॅज्युअल सेक्स’ला मानतो योग्य, जाणून घ्या त्याचा
सिनेप्रवास
आई स्मिता पाटीलच्या आठवणीत प्रतीक बब्बर भावूक; म्हणाला, ‘आई तू 34 वर्षांपूर्वी सोडून गेलीस, पण…’

हे देखील वाचा