Sunday, May 19, 2024

अभिनेत्री स्मिता पाटील यांचा मुलगा असलेला प्रतीक ‘कॅज्युअल सेक्स’ला मानतो योग्य, जाणून घ्या त्याचा सिनेप्रवास

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री स्मिता पाटील आणि अभिनेते राज बब्बर यांचा मुलगा आज बॉलिवूडमध्ये आपल्या नावाचा डंका गाजवत आहे. तो इतर कुणी नसून प्रतीक बब्बर (Prateik Babbar) आहे. प्रतीक साेमवारी (28 नोव्हेंबर) आपला 35 वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनेता एकापाठोपाठ एक अशा चित्रपटात झळकताना दिसत आहे. आता तो लवकरच ‘हिकअप्स ऍंड हुकअप्स’ या आगामी वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. त्यामुळे तो प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यात अभिनेत्री लारा दत्ता देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे. या वेबसीरिजमध्ये ती प्रतीकच्या बहिणीची भूमिका साकारत आहे. या सीरिजमध्ये सेक्स आणि रिलेशनशिप बोल्ड आणि मॉडर्न स्टाईलमध्ये दाखवण्यात येणार आहे, जे तुम्ही ट्रेलरमध्ये पाहू शकता. सीरिजच्या प्रमोशनशी संबंधित मुलाखतीत प्रतीकने त्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयीही काही गोष्टी सांगितल्या आहेत. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त आपण त्याने सांगितलेल्या त्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयी जाणून घेऊया. चला तर मग सुरुवात करूया…

माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत प्रतीक म्हणाला की, तो सेक्सला चुकीचा मानत नाही. तो म्हणाला की, “ज्यांचा प्रेमासारख्या गोष्टींवर विश्वास नाही, ते कॅज्युअल सेक्सवर विश्वास ठेवतात.” तो म्हणाला, “मी कॅज्युअल सेक्सचाही प्रयत्न केला आहे. मला असे वाटते की, लोक कधी ना कधी यातून जातात. वन नाईट स्टँड, फ्लिंग, हुकअप्स, यातूनही मी गेलो आहे.”

बोलण्याने समंजसपणा वाढतो
प्रतिकने मुलाखतीत सांगितले की, “हे महिला, पुरुष यापैकी कोणालाही होऊ शकते. या शोबाबत आम्हाला दोन प्रकारच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. काही लोक म्हणतात की, ज्या मुद्द्यांवर शतकानुशतके पडदा पडला आहे ते आम्ही मांडले आहेत. पण काही लोकांचा असा विश्वास आहे की, अशा प्रकारे पवित्र नाते दाखवणे योग्य नाही. माझा विश्वास आहे की, जेव्हा आपण आपल्या कुटुंबासमोर सेक्ससारख्या निषिद्ध गोष्टींबद्दल उघडपणे बोलतो, तेव्हा आपली परस्पर समज आणि बंध वाढतात.”

बहिणीचा घेतो सल्ला
प्रतीक बब्बरने आपल्या बहिणीसोबतच्या बाँडिंगबद्दलही सांगितले. या सीरिजमध्ये तो आपली बहीण लारा दत्तासोबत जेवढा मोकळा आहे, तेवढाच तो आपल्या बहिणीशीही बोलत असतो, असे तो म्हणाला. “मी दीदीकडून सल्ला घेतो, जेव्हा गरज असेल तेव्हा दीदीही माझा सल्ला घेते. अनेक मुद्द्यांवर आपण कुटुंबीयांशी बोलू शकत नाही, असे वर्षानुवर्षे आपल्याला शिकवले जाते, पण तसे नाही. मला वाटते की आपण तरुण पिढीकडून शिकले पाहिजे,” असेही तो म्हणाला आहे.

प्रतीकची कारकीर्द
प्रतीकबाबत बोलायचं झालं, तर अभिनयात येण्यापूर्वी तो प्रोडक्शन असिस्टंट म्हणून काम करत होता. त्याने सन 2008 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जाने तू’ या चित्रपटातून अभिनयात पदार्पण केले होते. यानंतर त्याने ‘दम मारो दम’, ‘आरक्षण’, ‘एक दीवाना था’, ‘बाघी 2’, ‘मित्रों’, ‘छिछोरे’, ‘दरबार’, ‘फोर मोर शॉट्स प्लीज’, ‘मुंबई सागा’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. आता तो ‘हिकअप्स एँड हुकअप्स’ या चित्रपटातही झळकणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
आई स्मिता पाटीलच्या आठवणीत प्रतीक बब्बर भावूक; म्हणाला, ‘आई तू 34 वर्षांपूर्वी सोडून गेलीस, पण…’

‘माझ्या आज्जी-आजोबांनी खूप चांगले वळण लावले..’,म्हणत प्रतिक बब्बरने व्यक्त केला अभिमान

हे देखील वाचा