Saturday, April 20, 2024

आई स्मिता पाटीलच्या आठवणीत प्रतीक बब्बर भावूक; म्हणाला, ‘आई तू 34 वर्षांपूर्वी सोडून गेलीस, पण…’

दिनांक 13 डिसेंबर 1986 रोजी बरोबर 34 वर्षांपूर्वी भारतीय सिनेसृष्टीवर एकहाती राज्य करणारी, अभिनयपूर्ण, चाणाक्ष, अफाट बुद्धिमत्ता, तसंच शिकाऊ वृत्ती असलेल्या स्मिता पाटील यांचे अकाली निधन झालं. या गोष्टीचा सर्वात मोठा धक्का हा त्यांच्या कुटुंबियांना बसला होता.

सिनेसृष्टीने एक ध्रुव तारा गमावलाच होता. परंतु त्याहीपेक्षा काही वाईट झालं असेल, तर फक्त दोन आठवड्यांच्या प्रतिक बब्बरने त्याची आई गमावली होती. आता प्रतिक 34 वर्षे दोन आठवडे वयाचा आहे. त्याने त्याच्या आईच्या स्मृतीदिनी इन्स्टाग्रामवर एक भावुक पोस्ट टाकली.

प्रतीक बब्बरने आपल्या आईचा फोटो शेअर करत लिहीलं आहे, ’34 वर्षांपूर्वी याच दिवशी आई आम्हाला सोडून निघून गेली. एवढ्या वर्षात माझी आई नक्की कशी असेल याची छबी मी माझ्या मनात निर्माण केली आहे. माझी आई एक परिपूर्ण स्त्री होती. एक पर्फेक्ट महिला…एक पर्फेक्ट रोल मॉडल. प्रत्येक लहान मुलीला तिच्याकडे बघून तिच्यासारखंच व्हावसं वाटेल अशी ती होती.’

‘माझी आई एक अशी स्त्री होती जी आई म्हणून आपल्या मुलाला कधीच एकटं पडू देणार नाही. मनाने ती अजूनही माझ्यासोबत असते. माझी आई दरवर्षी माझ्याप्रमाणेच तरुण होते. आताही ती 65 वर्षाची तरुणी आहे. माझ्या मनामध्ये ती कायमच जिवंत राहील. माझी आई माझ्यासाठी प्रचंड महत्वाची व्यक्ती आहे. ती माझ्यासाठी सुपर लेजेंड आहे.’

फक्त दोन आठवड्यांच्या या बाळाने त्याच्या आईला असं किती ते पाहिलं असणार? त्याच्या नशिबी आईचा पान्हा आला तोदेखील फक्त दोन आठवड्यांचाच… त्याची आई ही नेहमी तिच्या कालाकृतींमधून त्यांच्यापर्यंत पोहचत राहिली. वडील राज बब्बर यांच्या आठवणींमधून त्याला तिची माया जाणवली असेल. या सगळ्याची जाणीव प्रतिकला असल्याचं आपल्याला या त्याच्या पोस्ट मधून दिसून येतं.

काही वर्षांपूर्वीच नुकतंच राज बब्बर यांनी प्रतिकचं लग्न देखील लावून दिलं आणि आपला पितृधर्म पाळला. त्यासमयी देखील त्याला त्याच्या आईची आठवण आली असणार हे काही वेगळं सांगायला नको.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
आईच्या निधनानंतर अंमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या प्रतीक बब्बरने काढून टाकले होते वडिलांचे आडनाव

‘कॅज्युअल सेक्स’ला योग्य मानतो प्रतीक बब्बर; म्हणाला, ‘मीही केलाय प्रयत्न’

हे देखील वाचा