अभिनेत्री यामी गौतम चढली बोहल्यावर; ‘उरी’ दिग्दर्शक आदित्य धरसोबत थाटला संसार

actress yami gautam tied knot with director of uri movie


बॉलिवूडची प्रसिद्ध आणि ग्लॅमरस अभिनेत्री यामी गौतम, लेखक आणि दिग्दर्शक, आदित्य धर याच्यासोबत लग्नबंधनात अडकली आहे. तिने तिच्या लग्नाचा पहिला फोटो सोशल मीडियावर शेअर करून, चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. यामी गौतम व्यतिरिक्त, तिचा पती आदित्यनेही लग्नाचे फोटो शेअर केले आहेत.

यामी गौतमने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर हे लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तुम्ही पाहु शकता की, अभिनेत्रीने लाल रंगाची साडी नेसली आहे आणि आदित्य धरने पांढऱ्या रंगाची शेरवानी आणि पगडी घातली आहे. तसेच, वधूच्या वेशात यामी खूपच सुंदर दिसत आहे. यात दोघेही एकमेकांकडे बघून हसताना दिसत आहेत.

लग्नाचा पहिला फोटो शेअर करत, यामी गौतमने लिहिले आहे की, “तुझ्या प्रकाशात मी प्रेम करायला शिकले. आमच्या कुटुंबियांच्या आशीर्वादाने आम्ही आज लग्न केले. एक अतिशय खाजगी पध्दतीने आम्ही हा उत्सव केवळ आमच्या कुटुंबासोबतच साजरा केला आहे. आम्ही प्रेम आणि मैत्रीच्या प्रवासाला सुरुवात करत असताना, आम्हाला तुमच्या आशीर्वाद आणि शुभेच्छांची गरज आहे.” तसेच, आदित्य धरनेही याच कॅप्शनसह फोटो पोस्ट केला आहे.

यामी गौतमने आदित्य धर दिग्दर्शित ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’ या हिट चित्रपटात काम केले आहे. या चित्रपटात विकी कौशल मुख्य भूमिकेत होता. प्रेक्षकांना हा चित्रपट खूप आवडला होता. असे म्हणतात की, यामी गौतम आणि आदित्य धर या चित्रपटाच्या नंतरपासून रिलेशनशिपमध्ये आले होते. मात्र, दोघेही याबद्दल कधी काही बोलले नव्हते.

यामी गौतमच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर तिने दिग्दर्शक सुजित सरकारच्या ‘विक्की डोनर’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात ती आयुष्मान खुराना सोबत दिसली होती. यानंतर तिने बॉलिवूडच्या बर्‍याच चित्रपटांमध्ये काम केले. यामी गौतम आता ‘भूत पोलिस’ आणि ‘दसवी’ या आगामी चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

 


Leave A Reply

Your email address will not be published.