Saturday, January 31, 2026
Home बॉलीवूड लैंगिक छळाच्या पीडित महिलांच्या जीवनाला नवसंजीवनी देणार यामी गौतम, उचलले ‘हे’ पाऊल

लैंगिक छळाच्या पीडित महिलांच्या जीवनाला नवसंजीवनी देणार यामी गौतम, उचलले ‘हे’ पाऊल

छोट्या पडद्यावरून बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण करणारी यामी गौतम (Yami Gautam) आपल्या कामामुळे चर्चेत असते. त्याचबरोबर यामी तिच्या ऍक्टिव्हिटीमुळे देखील खूप चर्चेत असते. ती अनेकदा तिचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करत असते. यामीचे ‘अ थर्सडे’ या चित्रपटातील तिच्या दमदार अभिनयासाठी खूप कौतुक होत आहे. आता बातम्या येत आहेत की, यामीने दोन एनजीओशी हातमिळवणी केली आहे. खरं तर यामी देशभरातील सर्व लैंगिक शोषणग्रस्त महिलांना मदत करेल, म्हणूनच तिने एनजीओमध्ये प्रवेश केला आहे. या दोन्ही संस्था देशभरातील लैंगिक शोषणग्रस्त महिलांचे जीवन पूर्वीसारखे बनविण्याचे काम करतात. ती तिच्या क्षमतेनुसार योगदान देईल, असे यामीचे म्हणणे आहे.

अभिनेत्री यामी गौतम मजलिस आणि परी या दोन एनजीओशी संबंधित आहे. यामी म्हणाली की, “आज मी मोठ्या अभिमानाने सांगू इच्छिते की, मी दोन एनजीओसोबत हातमिळवणी केली आहे. जे लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या महिलांच्या पुनर्वसनासाठी सतत सहकार्य आणि काम करत आहेत.”

यामी पुढे म्हणाली की, “या मुद्द्यांवर काम करण्याची गरज आहे. त्यात बरीच प्रगती झाली असली तरीही सुरक्षेचे प्रश्न कायम आहेत. अजून बराच पल्ला गाठायचा आहे.” ती म्हणाली की, “सध्या माझी एनजीओसोबतची ही सुरुवात आहे. आगामी काळात मी सर्व स्तरातील महिलांचे संरक्षण आणि समर्थन करण्यासाठी अधिक चांगली संसाधने प्रदान करण्यात मदत करेन.”

यामी सध्या तिच्या ‘अ थर्सडे’ चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. हा चित्रपट डिझनी प्लस हॉटस्टारवर उपलब्ध आहे. याशिवाय ती अभिषेक बच्चनसोबत ‘दासवी’ या चित्रपटात पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेते अभिषेक बच्चन एका राजकारण्याच्या भूमिकेत दिसणार आहे.

गेल्यावर्षी झाले लग्न 

यामी गौतमने गेल्यावर्षी ‘उरी’च्या दिग्दर्शकासोबत सात फेरे घेतले होते. अभिनेत्रीने ४ जून रोजी आदित्य धरसोबत गुपचूप लग्न केले. अभिनेत्रीने तिच्या प्रेमकथेबद्दल सांगितले होते की, २०१९ मध्ये ‘उरी’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान आम्ही बोलू लागलो आणि नंतर चांगले मित्र झालो. यामीने सांगितले की, तिला पहिल्या नजरेत प्रेम झाले नव्हते. आधी ते चांगले मित्र होते आणि नंतर हळूहळू या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.

यामी गौतमच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ती येत्या काही दिवसांत अनेक चित्रपटांमध्ये दिसणार आहे. ज्यामध्ये ‘दासवी’, ‘ओएमजी २’ सारख्या मोठ्या चित्रपटांच्या नावांचा समावेश आहे. ‘दासवी’ या चित्रपटात ही अभिनेत्री अभिषेक बच्चनसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. दुसरीकडे, यामी ‘ओएमजी २’ मध्ये बॉलिवूडचा खिलाडी म्हणजेच अक्षय कुमारसोबत दिसणार आहे. ‘ओएमजी २’ हा ‘ओएमजी’ चित्रपटाचा सीक्वल आहे. ज्यामध्ये अभिनेता परेश रावल मुख्य भूमिकेत होते. अभिनेत्रीच्या या चित्रपटांसाठी चाहते खूप उत्सुक आहेत.

हेही वाचा – 

हे देखील वाचा