×

‘माझा नवरा आणि कंगनामध्ये संबंध होते’, जेव्हा आदित्य पांचोलीच्या अफेअरवर बोलली होती अभिनेत्याची पत्नी

कंगना रणौत (Kangana Ranaut) ही तिच्या वक्तव्यामुळे आणि रिलेशनशिपमुळे नेहमीच चर्चेत असते. ती चित्रपटात प्रदर्पण करण्याआधी खूप साऱ्या संकाटाना सामोरी गेली आहे. एकावेळी ती आणि आदित्य पांचोली (Aditya Pancholi) लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये होते. तेव्हा आदित्य पांचोली विवाहित होता. त्यामुळे त्याच्या एक्स्ट्रा मैरिटल अफेयरच्या चर्चा रंगल्या होत्या. परंतु याबाबत कंगना आणि आदित्यकडून कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण मिळाले नाही. त्यानंतर तिने एका मुलाखतीत आदित्यला खूप अपमानित केले होते. 

View this post on Instagram

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

एका मुलाखतीत तिने सांगितले की, आदित्यच्या जाळ्यातून सुटण्यासाठी तिने त्याच्या पत्नीचीही मदत मागितली होती. परंतु झरीनाने कंगनाची मदत करायला साफ नकार दिला होता. एका मुलाखतीत तिने हाही खुलासा केला आहे की, वडिलांच्या वयाच्या आदित्यने तिला एका खोलीत कैद केले होते. त्यावेळेस तिच्याजवळ पहिल्या मजल्याच्या खिडकीतुन उडी मारण्याशिवाय दुसरा पयाय नव्हता.

View this post on Instagram

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

तिचे हे सगळे आरोप आदित्यने खोडुन काढले. त्याने ती पागल असल्याचे सांगितले आणि कायदेशीर कारवाही करण्याची धमकीही दिली. “कंगनाने माझा वापर केला” असंही त्याने म्हटले.आदित्यची पत्नी झरीनाला सगळं माहित असूनही ती त्याच्या मागे खंबीरपणे उभी होती. तिने उघडपणे तिच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल करण्याचही बोलली होती. एका खासगी मासिकेला दिलेल्या मुलाखतीदरम्यान झरीनाने आदित्य आणि कंगनाच्या अफेअरबद्दल तिला माहित होतं असं तिने सांगितल आहे.

हेही वाचा-

Latest Post