जेव्हा ऐश्वर्याला घाबरून सुष्मिताने घेतला होता मिस युनिव्हर्सच्या यादीतून नाव मागे घेण्याचा निर्णय, जाणून घ्या तो किस्सा


बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन हिने ‘मिस इंडिया’ हा पुरस्कार जिंकून संपूर्ण भारतात तिचे नाव कमावले. एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या सुष्मितासाठी हा पुरस्कार जिंकणे काही सोपी गोष्ट नव्हती. इथपर्यंत पोहचण्यासाठी तिने खूप मेहनत केली. यानंतर संपूर्ण देशात तिला ओळख मिळाली. शुक्रवारी (१९ नोव्हेंबर) सुष्मिता सेन तिचा वाढदिवस साजरा करत आहे. चला तर जाणून घेऊया तिच्याबाबत काही गोष्टी.

सुष्मिताचा जन्म १९ नोव्हेंबर १९७५ साली हैद्राबादमध्ये एका बंगाली कुटुंबात झाला. जगातील अनेक सौंदर्यवतींना हरवून तिने १९९४ मध्ये मिस युनिव्हर्सचा पुरस्कार तिच्या नावी केला. परंतु यावेळी ती या स्पर्धेतून तिचे नाव मागे घेत होती. या गोष्टीचा खुलासा तिने स्वतः केला होता. तिने तिच्या मुलाखतीत सांगितले होते की, जेव्हा तिला समजले की, या स्पर्धेत ऐश्वर्या राय भाग घेणार आहे हे ऐकून तिने तिचे नाव मागे घेण्याचा विचार केला होता. (Sushmita Sen celebrate her birthday : let’s know about her)

एका शोमध्ये सुष्मिता सेनने सांगितले होते की, “जेव्हा १९९४ मध्ये जेव्हा मी मिस इंडिया स्पर्धेत भाग घेतला होता तेव्हा मला अजिबात माहीत नव्हते की, ऐश्वर्या राय यात भाग घेणार आहे. जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा २५ मुलींनी या स्पर्धेतून त्यांचे नाव मागे घेतले.”

तिने पुढे सांगितले की, “सौंदर्याबाबत ऐश्वर्या रायचा सामना कोणीही करू शकत नाही. ती या स्पर्धेत भाग घेणार आहे हे समजल्यानंतर अनेक मुली घाबरल्या होत्या. स्पर्धेत भाग घेण्याआधीच अनेकांनी हार मानली आणि नाव मागे घेण्याचा विचार केला. हे सगळं पाहून माझा आत्मविश्वास कमी व्हायला लागला आणि मी देखील माझे नाव मागे घेण्याचा विचार केला.”

सुष्मिताने पुढे सांगितले की, “२५ मुलींनी त्यांचे नाव मागे घेतले होते आणि मी देखील हाच विचार करत होते. या दरम्यान मी स्वतः ला प्रश्न विचारत होते. ऐश्वर्या रायचे नाव ऐकून मी म्हणाले माझा फॉर्म परत द्या मला यात भाग घ्यायचा नाही. मला असे वाटले की, ती एवढी सुंदर आहे की, संपूर्ण दुनिया तिला ओळखते त्यामुळे आपण यातून बाहेर पडलेले बरे.”

परंतु नंतर तिने हिंमतीने या स्पर्धेत तिचे नाव ठेवले आणि तिच्या ध्यानीमनी नसताना तिने ही स्पर्धा जिंकली देखील.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-KBC: शोदरम्यान स्पर्धकाने बिग बींना जया बच्चनबद्दल विचारला ‘असा’ प्रश्न, अभिनेत्याने शो सोडण्याची केली विनंती

-चार मुली जन्माला आल्यानंतर तुटले होते वडिलांचे मन, त्याच मुली आज बॉलिवूडवर गाजवतायत अधिराज्य

-‘सूर्यवंशी’मुळे पाकिस्तान त्रस्त! राष्ट्रपतींसह ‘या’ अभिनेत्रीने इस्लामोफोबियाबद्दल व्यक्त केली चिंता


Latest Post

error: Content is protected !!