Tuesday, May 21, 2024

‘जेव्हा मी पावसात अंघोळ करायची तेव्हा…’, एवढ्या वर्षांनी झीनत अमान यांचा मोठा खुलासा

बॉलिवूड अभिनेत्री झीनत अमान (Zeenat Aman) यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपट दिले. त्यांच्या अभिनयासोबतच त्यांच्या सौंदर्याचेही प्रेक्षकांना खूप वेड लागले होते. एक काळ असा होता जेव्हा झीनत यांना हिट्सची हमीही मानले जात होते. झीनत त्यांच्या चित्रपटांसोबतच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत असायच्या. अलिकडेच झीनत, पूनम ढिल्लनसोबत कपिल शर्माच्या शोमध्ये पोहोचल्या होत्या. जिथे त्यांनी तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले आणि कपिल आणि बाकीच्या टीमसोबत खूप मजा केली.

खरंतर झीनत अमान यांना कपिल शर्माने विनोदी पद्धतीने विचारले होते की, “तुम्ही अनेकदा चित्रपटांमध्ये पावसात अंघोळ करताना किंवा कधी धबधब्याखाली अंघोळ करताना दिसला आहात. यावर तुम्ही दिग्दर्शकाला कधीच प्रश्न विचारला नाही का, की मी अंघोळ करूनच आले आहे.” त्यावर उत्तर देताना जीनत म्हणाल्या, “कोणीतरी माझ्या मनात ही गोष्ट भरवली होती की, मी जेव्हा पावसात अंघोळ करते तेव्हा निर्मात्याच्या इथे पाऊस पडतो, तोही पैशाचा पाऊस.”

ज्येष्ठ अभिनेत्री झीनत त्यांच्या सौंदर्य आणि अभिनयामुळे जितक्या चर्चेत असायच्या तितक्याच त्या त्यांच्या बोल्डनेसमुळेही चर्चेत असायच्या. त्या त्यांच्या चित्रपटांमध्ये बोल्ड सीन्स देण्यासाठी देखील ओळखल्या जातात. झीनत यांनी ‘सत्यम-शिवम-सुंदरम’मध्ये अनेक सीन देऊन सर्वांना आश्चर्यचकित केले.

झीनत या बॉलिवूडमधील बोल्ड आणि सौंदर्याचे उत्तम उदाहरण आहे. दिग्गज अभिनेत्रीची चित्रपट कारकीर्द जितकी यशस्वी होते, तितकेच त्यांचे वैयक्तिक जीवन अधिक तणावपूर्ण होते. धाडसी आणि सशक्त व्यक्तिरेखा साकारणाऱ्या झीनत घरगुती हिंसाचाराच्या शिकार ठरल्या होत्या. माध्यमातील वृत्तानुसार, झीनत संजय खानसोबत रिलेशनशिपमध्ये होत्या. असे म्हणतात की, एके दिवशी संजय खानने झीनत यांच्यावर आपला राग काढला. झीनत यांचा डोळा खराब होण्याला संजय कारणीभूत असल्याचे बोलले जाते. याचा त्यांच्या कारकिर्दीवर मोठा परिणाम झाला आणि त्यांना प्रोजेक्ट मिळण्यात अडचणी निर्माण होऊ लागल्या.

झीनत यांनी त्यांच्या कुटुंबाच्या विरोधात जाऊन अभिनेता मजहर खान यांच्याशी लग्न केले. सुरुवातीला सर्व काही ठीक चालले. मात्र नंतर दोघांमधील वाद वाढू लागला. मजहरने झीनत यांच्याशी भांडणही सुरू केले होते. लग्नानंतर झीनत आणि मजहर यांना दोन मुले झाली. पण तरीही मजहरच्या वागण्यात कोणताही बदल झाला नाही. झीनत यांनी बॉलिवूड सोडून घरातील कामे सांभाळावीत अशी मजहर यांची इच्छा होती. पण झीनत यांनी त्याला साफ नकार दिला. त्यानंतर दोघांमध्ये खूप भांडण झाले.

झीनत यांच्या कारकिर्दीत ‘हरे रामा हरे कृष्णा’, ‘यादों की बारात’, ‘रोटी, कपडा और मकान’, ‘अजनबी’, ‘डॉन’, ‘धरम वीर’, ‘धुंध’, ‘कुर्बानी’, ‘इंसाफ का तराजू’, ‘पुकार’, ‘दोस्ताना’, ‘डार्लिंग डार्लिंग’, ‘हम किसी से कम नहीं’, ‘लावारिस’ आणि ‘चोरी मेरा काम’ या चित्रपटांचा समावेश आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर

हेही वाचा-
अरे बापरे! चक्क झीनत अमानवर उचलला होता ‘या’अभिनेत्याने हात, वाचा संपूर्ण किस्सा…
ऐश्वर्या राय आणि सुश्मिता सेन दोन विश्वसुंदरींमध्ये ‘या’ गोष्टीवरून सुरु झाले शीतयुद्ध

हे देखील वाचा