Monday, May 27, 2024

प्रसिद्ध दिग्दर्शकाने शेअर केला झीनत अमानसोबतचा फोटो; आता ‘अशी’ दिसतेय सदाबहार अभिनेत्री

सोशल मीडिया वापरत नाहीत, असे क्वचितच कलाकार पाहायला मिळतील. मात्र, जे कलाकार सोशल मीडियाचा वापर करतात, ते नेहमीच आपल्या आयुष्यातील चांगल्या- वाईट गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असतात. यासोबतच ते आपले फोटो आणि व्हिडिओही शेअर करत असतात. कधी-कधी ते आपल्या सहकलाकारांसोबतचेही फोटो शेअर करतात. आता असेच काहीसे पुन्हा एकदा पाहायला मिळाले आहे. ‘दिल तो बच्चा है जी’ फेम दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी सदाबहार अभिनेत्री झीनत अमान यांच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे.

मधुर आणि झीनत यांची भेट दुबईत आयोजित फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यादरम्यान झाली होती. या फोटोत झीनत यांच्या चेहऱ्यावर आजही तीच चमक दिसत आहे, ज्यावर चाहते घायाळ व्हायचे. (Director Madhur Bhandarkar Shares His Pic With Zeenat Aman From Filmfare Event In Dubai)

मधुर यांनी झीनत यांच्यासोबतचा हा फोटो शेअर करत खास कॅप्शन दिले आहे. त्यांनी आपल्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “जेव्हाही झीनत अमान यांच्याशी माझी भेट झाली आहे, तो शानदार अनुभव राहिला आहे. झीनत जी, भारतीय चित्रपट उद्योगातील मूळ दिवा म्हणून, तुमचे संपूर्ण व्यक्तिमत्त्व नेहमीच सर्वांसाठी प्रेरणादायी राहिले आहे. मॅडम तुम्हाला नेहमी आनंदी आणि उत्तम आरोग्याच्या शुभेच्छा.”

झीनत अमान यांच्यासोबतच आपल्या अभिनयाने चित्रपटसृष्टी गाजवलेले अनेक बॉलिवूड कलाकार या पुरस्कार सोहळ्यात सामील झाले होते. त्यामध्ये प्रेम चोप्रा, पद्मिनी कोल्हापुरे यांसारख्या कलाकारांचा समावेश होता. या क्षणी अनेक सुंदर फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळाले आहेत. हे फोटो ७०-८० च्या दशकातील कलाकारांच्या आठवणी ताज्या करत आहेत.

झीनत यांनी ‘इंडियन आयडल १२’च्या खास एपिसोडमध्येही हजेरी लावली होती. त्यांच्या सन्मानार्थ स्पर्धकांनी झीनत यांचे अनेक प्रसिद्ध गाण्यांवर शानदार परफॉर्मन्स केला होता.

मधुर भांडारकर यांच्याबद्दल बोलायचं झालं, तर त्यांनी ‘सत्ता’, ‘कॅलेंडर गर्ल्स’, ‘चांदनी बार’, ‘इंदू सरकार’, ‘ट्रॅफिक सिग्नल’, ‘कॉर्पोरेट’, ‘पेज ३’, ‘जेल’ यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अरर, हे काय झालं! जेवण बनवायला गेली आणि बोटंच घेतली कापून, लहान मुलांप्रमाणे रडत होती इलियाना

-घरी येऊन २४ तासांच्या आतच आर्यनने उचललं ‘हे’ पाऊल; पाहून तुम्हीही म्हणाल, ‘असं का केलं?’

-सगळं चांगलं सुरू असतानाच ‘त्या’ कारणामुळे अर्चनाने मारली कृष्णाला लाथ; व्हिडिओ जोरदार व्हायरल

हे देखील वाचा