Wednesday, July 3, 2024

‘बधाई दो’मध्ये भूमीच्या गर्लफ्रेंडच्या भूमिकेत दिसणार चुम दरंग, जाणून घ्या कोण आहे चुम

अभिनेता राजकुमार राव आणि भूमी पेडणेकर अभिनित ‘बधाई दो’ चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बनवण्यात आला आहे. जो समाजात सामान्य विषय नाही. या चित्रपटाची कथा एलजीबीटीक्यू समुदायाशी संबंधित आहे. चित्रपटाच्या टीझरमध्ये प्रथमदर्शनी काहीही स्पष्ट झाले नव्हते. मात्र ट्रेलरनंतर प्रेक्षकांना समजले की, हा चित्रपट काही सामान्य चित्रपट नाही. चित्रपटात राजकुमार तृतीपंथीच्या भूमिकेत आहे, तर भूमी पेडणेकर लेस्बियन बनली आहे.

या भूमिकेसाठी (Bhumi Pednekar) भूमीचे खूप कौतुक होत आहे. हा चित्रपट एका वेगळ्या संकल्पनेवर बनवला आहे. साधारणपणे, कोणतीही अभिनेत्री अशी भूमिका करण्यास कचरते, अभिनेत्रीच्या प्रतिमेतून रोल करणे खूप आव्हानात्मक आहे. मात्र, बदलत्या काळानुसार आता कोणत्याही अभिनेत्रीला सर्व प्रकारच्या भूमिका करायच्या असतात आणि अलीकडच्या काही वर्षांत प्रेक्षकांचा विचारही बदलला आहे.

अभिनेत्री चुम दरंग या चित्रपटात भूमीच्या गर्लफ्रेंडच्या भूमिकेत आहे. अलीकडेच माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत चुमने सांगितले की, “चित्रपटात एलजीबीटीक्यू कॅरेक्टर करण्याबद्दल मला कोणताही संकोच वाटत नाही. ही भूमिका करणं हे आव्हान होतं.” एफबीवरील या कास्टिंग जाहिरातीतून तिला ही भूमिका मिळाली. जाहिरात पाहून तिने टीमला मेसेज केला. त्यानंतर तिला ऑडिशनसाठी बोलावण्यात आले, ऑडिशननंतर तिची निवड झाली. चुम म्हणते की, “मी जी व्यक्तिरेखा साकारत आहे ती एका मजेदार मुलीची आहे. मी माझ्या दिग्दर्शकाचे म्हणणे ऐकले आणि टीमला काय हवे आहे ते समजून घेतले. ही भूमिका मी अत्यंत प्रामाणिकपणे साकारली आहे.”

हेही पाहा : साऊथ इंडस्ट्रीतील ‘हे’ सिनेमे कमाईच्या बाबतीत पुष्पाच्याही पुढे। Highest Grossing Movies Than Pushpa

 

‘बधाई दो’ दोन एलजीबीटीक्यू पात्रांची कथा सांगते. तृतीयपंथी पोलिस राजकुमार राव (Rajkumar Rao) आणि भूमी पेडणेकर आहेत. राजकुमार आणि भूमी यांनी लग्न करण्याचा आणि त्यांच्या कुटुंबापासून दूर राहण्यासाठी फ्लॅटमेट म्हणून राहण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्या आवडत्या लोकांशी संबंध ठेवले. भूमी पेडणेकर, चुम दरंग आणि राजकुमार राव यांच्या व्यतिरिक्त ‘बधाई दो’मध्ये सीमा पाहवा, शीबा चढ्ढा, लवलीन मिश्रा, नितेश पांडे, शशी भूषणंद दीपक अरोरा यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट शुक्रवारी (११ फेब्रुवारी) प्रदर्शित झाला आहे.

हेही वाचा :

 

 

हे देखील वाचा