Friday, April 19, 2024

आजीबाईंचे हिंदी गाण्यावर जोरदार ठुमके, पाहा अभिनेत्री अदा शर्माच्या आजीचा हा व्हायरल डान्स व्हिडीओ

अदा शर्मा म्हटलं की सोशल मीडिया पोस्ट आणि युट्यूबवर हिट्सचा पाऊस हे जणू समीकरण झालंय. ती सतत आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून नवनवीन व्हिडीओ किंवा फोटो शेअर करत असते. नुकताच तीने एक व्हिडीओ शेअर केला असून त्यालाही फॅन्सच्या चांगल्या लाईक्स व कमेंट्स येत आहे. या व्हिडिओमध्ये ती तिच्या आजीसोबत ‘ड्रंक एन हाय’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

अदा शर्माची प्रत्येक अदा ही अगदी निराळी असते. तिचे डान्स आणि फिटनेस व्हिडिओ सोशल मीडियावरील चाहत्यांचे बरेच लक्ष वेधतात. अदा शर्माचे नुकतेच ‘ड्रंक एन हाय’ गाणे रिलीज झाले आहे. अदाच्या या गाण्याने यूट्यूबवर बरीच धमाल केली. आता या गाण्यावर अदा शर्माने आजीबरोबर डान्स केला आहे. अदा शर्माचा हा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओवर चाहतेही जोरदार प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

या व्हिडिओमध्ये अदा शर्मा आपल्या आजीबरोबर चष्मा घालून ‘ड्रंक एन हाय’ गाण्यावर नाचत असल्याचे पाहायला मिळते. हे गाणे 29 जानेवारी रोजी रिलीज झाले होते. आतापर्यंत हा व्हिडिओ 93 लाखाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. अदा शर्मा सोबत मेलो डी आणि आस्था गिल यांनीही गाण्यात आपली कौशल्ये दाखविली आहेत.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे म्हणले, तर अदा शर्मा आजकाल दोन चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. त्यातील एक शॉर्ट फिल्म आहे आणि दुसरा तेलगू चित्रपट आहे. अदा शर्माचा शेवटचा चित्रपट हा ‘कमांडो 3’ होता.

शिक्षण संपल्यानंतर अदाने 2008 साली हॉरर चित्रपट ‘1920’ मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. ‘1920’ च्या यशानंतर अदा शर्माने बर्‍याच चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. ‘हंसी तो फंसी’ चित्रपटात तिने सिद्धार्थ मल्होत्राच्या गर्लफ्रेंडची आणि परिणीती चोप्राच्या बहीणीची भूमिका साकारली होती. या चित्रपटात अदा शर्माच्या अभिनयाचे बरेच कौतुक झाले. याशिवाय ‘कमांडो’ या चित्रपटातही अदा शर्मा मुख्य भूमिकेत दिसली होती.

हे देखील वाचा