Tuesday, April 23, 2024

‘द केरळ स्टोरी’ नंतर असे बदलले अदा शर्माचे आयुष्य, अभिनेत्रीने केला खुलासा

अभिनेत्री अदा शर्मा (Adah Sharma) सध्या तिच्या आगामी ‘बस्तर: द नक्सल स्टोरी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर आणि ट्रेलर रिलीज करण्यात आले, ज्यामुळे चाहत्यांची उत्कंठा वाढली. आता अलीकडेच, अभिनेत्रीने ‘द केरळ स्टोरी’च्या अफाट यशाबद्दल आनंद व्यक्त केला आहे आणि चित्रपटाच्या यशानंतर तिचे आयुष्य कसे बदलले आहे हे सांगितले आहे.

अलीकडेच एका मुलाखतीत अभिनेत्रीला विचारण्यात आले की ‘द केरळ स्टोरी’च्या यशानंतर तुमचे आयुष्य कसे बदलले? यावर अभिनेत्री म्हणाली, “खरं सांगायचं तर खूप काही बदललं आहे. या वेळा खूप छान वाटतात, जेव्हा लोक आता माझ्याबद्दल बोलतात तेव्हा मला जवळजवळ एक वेगळी व्यक्ती वाटते. या महिन्यात माझे तीन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत त्यामुळे माझ्यासाठी हा खूप चांगला काळ आहे.”

पुढे मुलाखतीत अभिनेत्रीला विचारण्यात आले की तिच्या फॅन फॉलोइंगमध्ये काही वाढ झाली आहे का? यावर अदाने उत्तर दिले, ‘हे खूप छान वाटते, पण मी या गोष्टी फारसे गांभीर्याने घेत नाही. अशा भूमिका करण्याचं भाग्य मला लाभलं आहे.”

अदाला विचारण्यात आले की बॉक्स ऑफिसवरील दबाव तिला कोणत्याही प्रकारे त्रास देतो का? यावर ती म्हणाली, ‘जर कोणी मला आठवण करून देत नसेल तर मी त्याचा अजिबात विचार करत नाही. मी बाहेरचा माणूस आहे आणि माझ्याकडे गमावण्यासारखे काही नाही. मी यशाची चव चाखणारी कलाकार झाली आहे. मी कृतज्ञ आहे की मला अशी पात्रे साकारायला मिळाली.”

नुकताच निर्मात्यांनी ‘बस्तर’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला होता. ट्रेलरमध्ये, अदा ही आयपीएस अधिकारी नीरजा माधवनच्या भूमिकेत दिसली, जी भारताला नक्षलमुक्त करण्याचा संकल्प करत होती. त्यात सीआरपीएफ जवानांवर नक्षलवादी हल्ले, लहान मुलांना जाळणे, राजकीय व्यक्तींची हत्या तसेच निरपराधांना फाशीची दृष्ये दाखवण्यात आली. हा चित्रपट 15 मार्च 2024 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

किरण रावच्या ‘लापता लेडीस’ने 10 दिवसातच केली बजेटच्या दुप्पट कमाई, जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन
लेकाच्या ‘सनकी’ चित्रपटाच्या घोषणेनंतर सुनील शेट्टी भावुक, शेअर केली ‘ती’ भावनिक नोट

हे देखील वाचा