Monday, April 15, 2024

किरण रावच्या ‘लापता लेडीस’ने 10 दिवसातच केली बजेटच्या दुप्पट कमाई, जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन

किरण राव (Kiran Rao) दिग्दर्शित लापता लेडीज हा चित्रपट सध्या थिएटरमध्ये चालू आहे. हा चित्रपट रिलीझ झाल्यापासूनच बॉक्स ऑफिसवर चांगली कामे करत आहे. १ मार्च रोजी हा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे. केवळ १० दिवसात या चित्रपटाचे त्याच्या बजेटच्या दुप्पट कमाई केलेली आहे. प्रेक्षकांना हा चित्रपट चांगलाच आवडत आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, ‘लापता लेडीज’ बॉक्स ऑफिसवर रविवारी (10 तारखेला) चांगला व्यवसाय करत आहे. सुरुवातीच्या आकडेवारीनुसार, चित्रपटाने आतापर्यंत 1.05 कोटींची कमाई केली आहे. यासह, चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर एकूण 8.58 कोटींची कमाई केली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘लापता लेडीज’चे बजेट 4 ते 5 कोटी रुपये आहे आणि कलेक्शन रिपोर्टनुसार, चित्रपटाने बजेटपेक्षा दुप्पट व्यवसाय केला आहे. ‘लापता लेडीज’ची पडद्यावर ‘आर्टिकल 370’, ‘क्रॅक’ आणि ‘शैतान’ सारख्या चित्रपटांसोबत टक्कर झाली होती, पण तरीही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर यश मिळवले आहे.

‘लापता लेडीज’ची कथा दोन नववधूंच्या देवाणघेवाणीने सुरू होते. रेल्वे प्रवासादरम्यान आपली वधू गमावलेल्या दीपकने तिला शोधण्याची शर्यत सुरू केली आणि यादरम्यान अनेक छुपे पैलू समोर येतात. मनोरंजन आणि नाटकासोबतच या चित्रपटात एक खास सामाजिक संदेशही दडलेला आहे.

‘लापता लेडीज’चे दिग्दर्शन किरण राव यांनी केले असून आमिर खानने निर्मिती केली आहे. चित्रपटात नितांशी गोयल, प्रतिभा रंता, स्पर्श श्रीवास्तव, छाया कदम, रवी किशन, भास्कर झा, दुर्गेश कुमार आणि गीता अग्रवाल यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

लग्नाच्या अफवांवर तापसी पन्नूने सोडले मौन; म्हणाली, ‘मला जेव्हा सांगायचे तेव्हा…’
सुशांतबद्दल बोलताना अंकिताची प्रतिक्रिया समोर; म्हणाली, ‘मला कोणीही रोखू शकत नाही’

हे देखील वाचा