फरहान अख्तरची पहिली पत्नी यापेक्षा मोठी ओळख असलेल्या अधुना भबानीने ‘या’ क्षेत्रात कमावले मोठे नाव

बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माता, गायक, लेखक आणि प्रभावी अभिनेता असणाऱ्या फरहान अख्तरची पहिली पत्नी असलेली अधुना भबानी आज (३० मार्च) रोजी तिचा ५५ वा वाढदिवस साजरा करत आहे. फरहान आणि अधुना यांनी काही वर्षांपूर्वी घटस्फोट घेतला असला तरी आजही अधुनाची ओळख मीडियामध्ये लोकांमध्ये फरहान अख्तरची बायको अशीच आहे. मात्र तसे पाहिले तर अधुनाची ओळख यापेक्षा कितीतरी वेगळी आणि मोठी आहे. अधुना एक प्रसिद्ध आणि लोकप्रिय हेयर स्टायलिस्ट असून, तिचे अनेक हेयर प्रोडक्ट आणि सलून आहेत. आज अधुना तिचा वाढदिवस साजरा करत असून, त्या निमित्ताने जाणून घेऊया तिच्याबद्दल अधिक माहिती.

View this post on Instagram

A post shared by Adhuna (@iadhuna)

अधुना भबानीचा जन्म इंग्लंडमध्ये झाला. तिचे वडील आशिष भबानी बंगाली आणि आई एन भबानी ब्रिटिश होती. अधुना लहान असताना तिच्या आईसोब सलूनमध्ये जायची ते पाहूनच तिला हेयर स्टायलिस्ट होण्यासाठी प्रेरणा मिळाली. यानंतर तिने नॉर्थवेस्ट इंग्लंडच्या एका सलूनमध्ये वर्थिंगटन हेयरमध्ये इंटर्नशिप केली. अधुनाने वयाच्या केवळ १७ व्या वर्षी तिने अंडर २१ राष्ट्रीय जुनियर हेयरस्टाइल चॅम्पियनशिप जिंकली.

View this post on Instagram

A post shared by Adhuna (@iadhuna)

अधुना भबानीने सर्वात आधी १९९८ साली आपला भाऊ आणि बिजनेस पार्टनर असलेल्या ओश भबानीसोबत मिळून मुंबईमध्ये पहिले ‘जूस’ हे सलून सुरु केले. त्यानंतर त्याचे नाव बदलून ‘बी ब्लंट’ केले. अधुनाने २००१ साली फरहान अख्तरच्या ‘दिल चाहता है’ सिनेमातून हेयर स्टायलिस्ट म्हणून आपल्या बॉलिवूड करिअरची सुरुवात केली. यानंतर या दोघांनी २००४ साली आलेल्या ऋतिक रोशनच्या ‘लक्ष्य’ सिनेमात पुन्हा एकत्र काम केले. यासाठी तिचे खूप कौतुक देखील झाले. अधुनाने आणि तिच्या टीमने मिळून दिल धड़कने दो, जिंदगी न मिलेगी दोबारा, दंगल, रईस आदी जवळपास ५० बॉलिवूड चित्रपटांमध्ये हेयर स्टायलिस्ट म्हणून काम केले.

View this post on Instagram

A post shared by Adhuna (@iadhuna)

अधुना आणि फरहान यांनी तीन वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर फरहानने २००० साली त्याच्याहून सहा वर्ष मोठ्या अधुनासोबत लग्न केले. १९९७ साली या दोघांची जुहूच्या एका नाईट क्लबमध्ये पहिली भेट झाली. फरहान आणि अधुना यांना अकीरा आणि शाक्या या दोन मुली आहेत. मात्र २०१७ साली त्यांनी एकमेकांपासून बंगले होत घटस्फोटाचा निर्णय घेतला. आणि १७ वर्ष जुना संसार मोडला. आपापसात असणाऱ्या मतभेदांमुळे त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. मात्र अजूनही ते चांगले मित्र असून मुलींसाठी सतत भेटत देखील असतात.

View this post on Instagram

A post shared by Adhuna (@iadhuna)

फरहान अख्तरपासून वेगळे झाल्यानंतर अधुना भबानीने निकोलो मोरियाला डेट करायला सुरुवात केली. निकोलो मोरिया हा बॉलिवूड अभिनेता दिनो मोरियाचा भाऊ असून २०१९ साली इंस्टावर त्यांनी त्यांचे नाते अधिकृत केले. त्यावेळी अधुनाने लिहिले होते की, “प्रामाणिकपणा आणि चांगुलपणाच्या या अडीच वर्षांसाठी धन्यवाद निकोलो. माझी प्रत्येक गोष्ट स्वीकारण्यासाठी मग भलेही माझा चांगुलपणा असो, वाईट गुण असो किंवा कुरूपता असो…सर्व गोष्टींना स्वीकारण्यासाठी मनापासून धन्यवाद. मला प्रेम देण्यासाठी आणि जवळकरण्यासाठी धन्यवाद.” नुकतेच फरहान अख्तरने देखील अभिनेत्री शिबानी दांडेकरसोबत लग्न केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

Latest Post